मुख्यमंत्री ठाकरेंकडून दोन नेत्यांवर शिंदेंच्या मनधरणीची जबाबदारी; सुरतकडे रवाना

एकनाथ शिंदे सुमारे 20 हून अधिक आमदारांसह सुरतमध्ये ठाण मांडून आहेत.
मुख्यमंत्री ठाकरेंकडून दोन नेत्यांवर शिंदेंच्या मनधरणीची जबाबदारी; सुरतकडे रवाना
Eknath Shinde Latest News, Milind Narvekar Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. एक-दोन नव्हे तर वीसहून अधिक आमदार शिंदेंसोबत असल्याचे सांगितले जात आहे. तर आता दुसरीकडे हे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी दोन नेत्यांना सुरतकडे रवाना केले आहेत. (Shiv Sena Leader Eknath Shinde News in Marathi)

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपले विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि आमदार रविंद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते सुरतला रवाना झाले असून शिंदेंसोबत चर्चा करणार आहेत. ठाकरेंनी शिंदे यांच्यासाठी त्यांच्याकडे निरोप दिला आहे. हा निरोप नेमका काय आहे, शिंदे माघार घेणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

Eknath Shinde Latest News, Milind Narvekar Latest Marathi News
नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता! नारायण राणेंच्या ट्विटनं खळबळ

दरम्यान, आमदार संजय राठोड, दादा भुसे आणि संजय बांगर हेही शिंदेंच्या संपर्कात असल्याचे समजते. हे तिघेही आमदार मुंबईत असून वर्षावर शिवसेनेच्या बैठकीलाही हजर आहेत. त्यांनीच शिंदे यांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्याचे समजते.

एकनाथ शिंदे रिलॅक्स मूडमध्ये

शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. ते रिलॅक्स मुडमध्ये सुरतमधील 'ली मेरेडियन' या हॉटेलमध्ये पुढचे निर्णय घेत आहेत, अशी माहिती त्या हॉटेलमध्ये उतरलेल्या `सरकारनामा`च्या वाचकाने दिली.

हा वाचक आज सकाळीच त्या हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने आधी बुकिंग केले होते. तरी त्याला पोलीस सोडत नव्हते. मात्र आधी बुकिंग केले असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितल्यानंतर त्याला प्रवेश मिळाला. आज सकाळी नाष्ट्याच्या वेळी एकनाथ शिंदे विटकरी रंगाच्या टी शर्टमध्ये लॉबीत फिरत असल्याचे या वाचकाला दिसले. शिंदे यांच्या हातात एक कागद होता. त्या कागदावरून ते सतत नजर फिरवित होते. इतर आमदारांचे आणि चेहरे मात्र या वाचकाला ओळखता आले नाहीत. हा वाचक एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनील मोठ्या पदावर आहे.

Eknath Shinde Latest News, Milind Narvekar Latest Marathi News
दिल्लीत घडामोडींना वेग अन् चंद्रकांतदादा म्हणतात, फडणवीस मिठाई वाटण्यासाठी गेलेत!

या वाचकाच्या म्हणण्यानुसार सुरत विमानतळापासून हे हॉटेल फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे. या हॉटेलचे जुनेनाव द ग्रॅण्ड भगवती असे आहे. ली मेरेडियन ग्रुपने ते चालवायला घेतले आहे. हॉटेल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कोणालाही चौकशी केल्याशिवाय आत सोडले जात नाही किंवा बाहेर येऊ दिले जात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in