गुलाबराव पाटील ३ आमदारांसह गुवाहटीमध्ये पोहचले; शिंदेंना वाकून केला नमस्कार...

एकनाथ शिंदेंच्या गोटात तब्बल ३ कॅबिनेट मंत्री आणि ३ राज्यमंत्री
गुलाबराव पाटील ३ आमदारांसह गुवाहटीमध्ये पोहचले; शिंदेंना वाकून केला नमस्कार...
Eknath Shinde | Gulabrao Patil Sarkarnama

मंत्री गुलाबराव पाटील ३ आमदारांसह गुवाहटीमध्ये दाखल. यात मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित, योगेश कदम अशा आमदारांचा समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनी तिथे पोहचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना वाकून आदरार्थाी नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राजीनामा देणार नसल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडापुढे न झुकण्याचा इरादा शिवसेनेने व्यक्त केला आहे. तसेच वेळ पडल्यास अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकार टिकवायचे असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी कोणतीही सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले. त्यामुळे ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.  

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला ठेंगा दाखवला आहे. शिवसैनिक महाविकास आघाडीमध्ये भरडला गेला असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. 

Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

काय म्हणाले एकनाथ शिंदे? १. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. २. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. ३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. ४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचे अतंर्गत प्रश्न आहे. मात्र भाजप विरोधातील आघाडी टिकवायची असेल तर शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास काॅंग्रेसची हरकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले. महाविकास आघाडी सरकार टिकवायचे तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे यांना केली. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता नाना पटोले यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दाखवला. या सगळ्या हालचालीतून  शिंदे हे महाविकास आघाडीचे एकमताचे उमेदवार ठरतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. अर्थात ठाकरे यांच्या आवाहनावर शिंदे यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ते संध्याकाळी सात वाजता गुवाहटी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार होते. पण त्यांनी ते टाळले. आता ट्विटद्वारे ते आपली पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला पदाचा मोह नाही, असे सांगत आपण आजच वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज ते वर्षावरच मुक्कामास राहणार आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची तेथे भेट घेतली. काॅंग्रेसच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ वर्षा येथे घोषणाबाजी करण्यात आली. 

संख्यागौण आहे. लोकशाहीत संख्या जमली तर ते जिंकतात. पण माझ्याविरोधात माझीच लोक जर उभी राहिली तर काय? माझ्याविरोधात एकाने जरी मतदान केले तरी ती गोष्ट माझ्यासाठी लाजीरवाणी. 

मुख्यमंत्री पद अनपेक्षितरित्या आलं, मी चिटकून बसलो नाही.

शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.

मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. मला फक्त समोर येवून सांगा. तुम्ही स्वतः हे पत्र राजीनाम्याचं पत्र देवून राजभवनात जा.

मी पदाला चिटकून बसलोय असं समजू नका. मी आजच वर्षावरुन मातोश्रीवर मुक्काम हलवणार आहे. 

आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. तुम्ही समोर येवून बोला. 

बंडखोरांनी समोर येवून सांगा, उद्धवजी राजीनामा द्या, तुम्ही कारभार करण्यास नालायक आहे. 

आज सकाळी मला शरद पवार आणि कमलनाथ यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. पण माझ्या जवळच्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखविला. 

हो मला दुःख झाले. होय मला धक्का बसला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बैठक झाली. त्यात मला पवार साहेबांनी सांगितले की मुख्यमंत्री तुम्हाला व्हाव लागेल. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. 

मी इच्छेपेक्षा जिद्दीने लढणारा माणूस. एकदा जबाबदारी आली की ती पार पाडतोच. 

विधान परिषद निवडणुकीपूर्वी मी हॉटेलमध्ये आमदांरासोबत बोललो. हॉटेलमध्ये ठेवणे, आपल्याच लोकांवर शंका घेणे हे मला पटतं नाही. 

२०१२ नंतर जे काही मिळाले ते बाळासाहेबांचीच शिवसेना आहे, आणि शिवसेनेच दिले आहे हे लक्षात ठेवा. 

शिवसेना हि बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. 

विधानसभेत हिंदुत्वाबद्दल बोलणारा बहुतेक मी एकटाच. 

राहिला प्रश्न शिवसेना आणि हिंदुत्वाचा. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांत गुंफाल्या आहेत. त्यामुळेच आदित्य आणि एकनाथ शिंदे हे अयोध्येला जावून आले. 

मुख्यमंत्री भेटत नाहीत अशी तक्रार आली. मी भेट नव्हतो म्हणजे माझ्या शस्त्रक्रियामुळे भेटत नव्हतो. 

उद्धव ठाकरे शिवसेनेवरच बोलणार.

प्रशासन माहिती नसलेल्या माणसाला सुरुवातीलाच कोव्हिड आला.

माझा आवाज आणि चेहरा पडला आहे, पण हे कोव्हिडमुळे आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबूक लाईव्ह अद्याप सुरु झालेले नाही. मात्र त्याचवेळी संध्याकाळी ७ वाजता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. 

आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.  या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण म्हाराष्ट्राचे  लक्ष लागले आहे.

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार  भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता पाठिंबा मिळत असून शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहटीकडे आपला मोर्चा वळवला. याशिवाय संजय राठोड, योगेश कदम आणि चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)हे तीन आमदारही शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. गुलाबराव पाटील हे कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भाषा करत होते. पण त्यांनीही आपला पवित्रा बदलला. मंत्रीमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. सकाळपासूनच ते नाॅट रिचेबल होते. त्यांच्या फुटिरतेबद्दल चर्चा सुरूच होती. दुपारी दीडनंतर ते गुवाहटीच्या वाटेवर असल्याचे विश्वासार्ह वृत्त प्राप्त झाले. पाटील यांच्यासह संदिपान भुमरे हे दोन कॅबिनेट मंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. याशिवाय बच्चू कडू, शंभूराज देसाई असे दोन राज्यमंत्रीही तेथे आहेत. त्यामुळे एकूण चार मंत्र्यांनी बंडात सक्रिय सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही. गटनेता निवडताना मेजॉरिटी लागते. आमच्याकडे ४२ आमदार आहेत. मी शिवसेनेतच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.  

Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज राज्यातील राजकीय घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी फक्त 'नो काॅमेंट,' अशा दोन शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे. सककार बरखास्त करण्याचा प्रसंग आल्याचे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरही त्यांनी नो काॅमेंट, असेच उत्तर दिले.

Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

मला हार्ट अॅटक आल्याचे धादांत खोटं,मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचण्यात आलं, मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रीया एकनाथ शिंदेंच्या गोटात गेलेल्या नितीन देशमुख यांनी नागपुरात पोहल्यानंतर विमानतळावर दिली आहे.  मी आलो बाकीचेही येतील, असा दावाही देशमुख यांनी केला आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंची  अॅंटीजेन चाचणी पॉझिटिव्ह, पण आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार बरखास्तीची शिफारस करणार, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव येण्याची शक्यता

नॉटरिचेबल व्हायचं नाही, मतदार संघ सोडायचा नाही, मुंबईतील असलेल्या आमदारांना मुंबईतच राहण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत.  

महाराष्ट्र कॉंग्रेसचे सर्वच्या सर्व ४४ आमदार कॉंग्रेससोबत आहे. पण काही चॅनल चूकीच्या बातम्या देत आहेत.कॉंग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही- बाळासाहेब थोरात

संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !  - नितेश राणेंचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले- छगन भुजबळ

दुपारी एक वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. 

उद्धव ठाकरेंनी गटनेता नियमबाह्य पद्धतीने निवडला,  अजय चौधरी गटनेतेपदी नियुक्ती करणे हे नियमबाह्य असल्याचा दावा एकनाथ शिंंदे यांनी केला आहे. 

राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने गोव्याचे राज्यपाल श्रीधरन यांच्याकडे कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता

भाजप पक्षश्रेष्ठींकडून सत्तास्थापनेची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या टीमकडे देण्यात आली आहे. 

संजय राऊतांनी ट्विट करत मध्यावधी निवडणूकांचे संकेत दिले आहेत. तर माझा गट हीच माझी शिवसेना असे एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने---- संजय राऊतांनी ट्विट करत विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले   

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील सकाळपासून नॉटरिचेबल 

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर  पोलीस बंदोबस्त वाढवला

शिवसेना समर्थक आमदार गीता जैन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यार पोहचल्या आहेत.  आज सकाळपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी केली चर्चा. देवेंद्र फडणवीसांच्या

मुंबईच बी. वाय चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रवादीची  खलबतं 

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरील मंत्रीपदाचा उल्लेख हटवला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण, पुढील कामे ऑनलाईन पद्धतीने होणार

आम्ही आज सगळे आमदार एकत्र आहोत. आजही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, विचारधारा पुढे घेऊन जात आहोत, एवढंच सांगू इच्छितो. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. -एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना संदेश

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातमधून गुवाहाटीत दाखल 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.