दिल्लीत घडामोडींना वेग अन् चंद्रकांतदादा म्हणतात, फडणवीस मिठाई वाटण्यासाठी गेलेत!

एकनाथ शिंदे यांच्या बंडांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Chandrakant patil Latest Marathi News
Chandrakant patil Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सकाळीत तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. काही वेळापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या घडामोडींबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता फडणवीस हे मिठाई वाटण्यासाठी दिल्लीत गेल्याचे त्यांनी सांगितले. (Chandrakant Patil Latest Marathi News)

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण सुरतमधील एका हॉटेलमध्ये आहेत. गुजरात भाजपकडून त्यांची सर्व व्यवस्था केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर भाजपने मात्र याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Chandrakant patil Latest Marathi News
एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, चंद्रकांत पाटील यांनीच सगळी व्यवस्था केलीय! संजय राऊतांचं मोठं विधान

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमध्येही नाराजी आहे. ते आता बाहेर आली आहे. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय नेत्यांना मिठाई देण्यासाठी आम्ही जातो, ही परंपरा आहे. फडणवीस हेही दिल्लीत आमच्या नेत्यांना मिठाई वाटण्यासाठी गेले आहेत.

एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव आल्यास भाजप स्वीकारेल, असा दावाही पाटील यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे शिवसेनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. लोक सहन करू शकत नाहीत, हे एकनाथ शिंदेंच्या बंडातून दिसून आलं आहे. त्यांनी प्रत्येक मुद्दावर कठोरपणे बोलण्याची गरज नाही, अशा शब्दांत पाटील यांनी राऊत हेच या बंडाला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. बदलाबाबत आताच काही बोलणे घाईचे होईल. ही स्थिती काळजीपूर्वक हाताळायला हवी. त्याकडे आमचं बारकाईनं लक्ष आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिंदे काय भूमिका घेणार आणि शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय तोडगा काढणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com