आता वेळ निघून गेली! सरकार पडल्यानंतरच शिंदे परत येणार

संजय राऊत यांच्या आवाहनाला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.
आता वेळ निघून गेली! सरकार पडल्यानंतरच शिंदे परत येणार
Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांनी मुंबईतून येऊन चर्चा करावी. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे मांडावे. त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून तातडीने त्यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. (Eknath Shinde Latest News)

राऊतांनी आवाहन केल्यानंतर शिंदे गटाने आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा मगच चर्चा करू, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतल्याचे सुरूवातीला समजत होते. पण आता 'संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेली आहे,' असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest News
सोमय्यांच्या 'डर्टी डझन'मधील दोन आमदार भाजपला चालतील का?

चाळीसहून अधिक शिवसेनेचे आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे. पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देणार आहेत.

Eknath Shinde Latest News, CM Uddhav Thackeray Latest News
उद्धव ठाकरेंकडे उरले दोन कॅबिनेट मंत्र्यांसह केवळ पंधरा आमदार! ही नावं पक्की...

शिंदे गटाने घातलेल्या अटीमुळे आता सरकार पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सरकार पाडूनच शिंदे गट महाराष्ट्रात परतणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, "शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी," " बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आवाहन राऊत यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in