वरिष्ठांच्या आदेशानुसारच गुवाहाटीत! गीता जैन यांचे वरिष्ठ कोण? चर्चांना आलं उधाण

गीता जैन यांच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
Geeta Jain Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
Geeta Jain Latest Marathi News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

मुंबई : अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेतील बंडामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत सूचक विधान केलं आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसारच गुवाहाटीला जात असल्याचं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याआधी त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. तर सरकारस्थापनेवळी त्या शिवसेनेसोबत होत्या. त्यामुळे जैन यांचे वरिष्ट नेमके कोणत्या पक्षातील याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. (Geeta Jain Latest Marathi News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये जैन सामील झाल्या आहेत. गीता जैन यांनी काही तासांपूर्वी फेसबूक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आजही आपण भाजपचे (BJP) समर्थक असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान माझ्याकडून घेण्यात आलेल्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असून मी आपणा सर्वांना सांगू इच्छते कि, आज देखील मी भाजपाची नगरसेविका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Geeta Jain Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
आमदार फोडल्यानंतर आता शिवसेनेत उभी फूट पाडण्याची शिंदेंची स्ट्रॅटेजी?

विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आदर्श मानून मत मागितले होते. त्यानंतर देखील मी त्यांना आदर्श मानून कार्य करत आहे. सध्या मी जी काही भूमिका घेतली आहे ती देखील वरिष्ठांच्या आदेशानुसारच आहे. मी गुवाहाटीला वरिष्ठांच्या आदेशानुसारचं जात आहे, असं जैन यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता हे वरिष्ठ नेमके कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Geeta Jain Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
शहा निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सरशी

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गीता जैन या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. या लढतीत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी युतीचे सरकार येईल, या अपक्षेने भाजपसोबत राहणे पसंत केले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मात्र जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पण विधान परिषद निवडणुकीवेळी त्यांनी भाजपला मदत केल्याची चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com