हितेंद्र ठाकूरांसोबत वाटाघाटीला दोन राऊत अन् राजन विचारे; एकनाथ शिंदेंना सेनेने लांबच ठेवलं?

RajyaSabha Election Latest News : ठाणे-पालघर या भागात एकनाथ शिंदे यांचे मोठे वर्चस्व मानले जाते.
Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News UpdatesSarkarnama

वसई-विरार : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या वसई तालुका चर्चेत आला आहे. या निवडणुकीचे संपूर्ण राजकारण हे इथल्या बहुजन विकास आघाडी आणि पक्षाचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याभोवती फिरत आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्यारुपाने आपला दुसरा उमेदवार उभा केल्याने निवडणूक अटीतटीची झाली आहे. त्यामुळे एकेक मतांसाठी भाजप आणि शिवसेना प्रयत्न करत आहे. अशातच बहुजन विकास आघाडीकडे ३ आमदार असल्याने त्यांच्या पठिंब्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्याकडे खेटे घालत आहेत. (RajyaSabha Election Latest News)

आज बुधवारी सायंकाळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे या नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे माजी खासदार अशोक मोहोळ हे नेते देखील उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीही आमदार सुनिल राऊत आणि खासदार राजन विचारे यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती.

Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
शिवसेना नेते हितेंद्र ठाकूरांना ४ दिवसात २ वेळा भेटले; अखेर ठाकरेंनी पवारास्त्र वापरले!

मात्र या सर्व घडामोडींदरम्यान, शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते, आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ठाकूर यांच्यासोबतच्या वाटाघाटीवेळी कुठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत? त्यांना शिवसेनेने ठाकूरांसोबतच्या वाटाघाटीपासून लांब ठेवले का? असे प्रश्न पडत आहे. कारण ठाणे-पालघर या भागात एकनाथ शिंदे यांचे मोठे वर्चस्व मानले जाते. हा भाग त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. पालघर, ठाणे जिल्ह्यामील लोकसभा, विधानसभा असो किंवा ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई विरार महानगर पालिका निवडणूक असो, प्रत्येक वेळी नगरविकास मंत्री आणि पालघरचे प्रभारी एकनाथ शिंदे हे सेनेचे स्टार प्रचारक होते.

Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News Updates
राज्यसभा निवडणूक : तीन आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूरांची चलाख खेळी..

मात्र याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विधानसभा, महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता 'बविआ' महाविकास आघडीचा भाग असूनही सातत्याने शिंदे यांच्याकडून ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम केले जात असल्याची टीका केली जाते. त्यामुळेच राज्यसभेच्या निवडणूक प्रचारातून सेनेने एकनाथ शिंदे यांनी दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर शिवसेनेच्या आमदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in