जे ठाकरे,पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं...

Ramdas Kadam : या आधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले.
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest NewsSarkarnama

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना नेत्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. यामुळे कुठल्याही मुद्द्यावर एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही. दरम्यान, शिंदे गटाचे उपनेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मुख्यमंत्री शिंदेंची स्तुती करतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपलं सरकार राज्यात आल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असून कोकणवासियांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी कुठलाही त्रास झाला नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चोख काम बजावलं आहे. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मिळून अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, पोलिसांना १५ लाखांत घरे हे निर्णय घेतले. मागच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackearay),राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवारांना जमलं नाही ते या सरकारने करून दाखवले, अशा शब्दात कदमांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले. (Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News)

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
'ये मीठा है, ओ कडू है', बच्चू कडूंबद्दल सत्तार असे का म्हणाले, करावं लागल स्पष्ट

ते म्हणाले की, शिंदेंनी मुंबई-गोवा महामार्गावरचे काम प्रगतीपथावर आणलं असून शिंदेंच्या मुलाने म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेंवी गणेशोत्सवानिमित्त ४०० एसटी बसेस कोकणवासियांसाठी मोफत सोडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी असं करणं हे पहिल्यांदाच घडलेल बघायला मिळालं आहे. जो स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला असे काम शिंदेंचे सुरू असून ते राज्यात चांगले निर्णय घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र काम करतात आहेत. मंत्रालयात भेटतात, वेळ देतात. याआधीचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ ३ वेळा मंत्रालयात आले, असा खोचक टोला देखील कदमांनी ठाकरेंना लगावला.

कदम पुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री कसा असावा हे शिंदेंनी दाखवून दिले आहे. आता शिंदे आणि फडणवीस हे दोघंही अनुभवी नेते असल्याने एक से भले दो.. अस झाल्याने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेत आहेत. हा मुख्यमंत्री आमचा आहे, अशी भावनाही लोकांच्या मनात निर्माण झाली असून मी कोकणवासियांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदें आणि फडणवीसांचे आभार मानतो, असे कदमांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
ठाकरेंसारखा मुख्यमंत्री कधी झाला नाही..आणि यापुढेही होऊ नये; राणेंचा टोला

दरम्यान, शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोनंतर कदमांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवत आहेत. शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नसून मला आणि माझ्या मुलाला अनेकदा अपमानित करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com