एकनाथ शिंदे गटाला केंद्रातही सत्तेचा वाटा; ‘या’ खासदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपद!

उद्धव ठाकरे यांच्यापुढे लढताना आता केंद्रातूनही एकनाथ शिंदे यांना बळ मिळणार, हे उघड आहे.
Prataprao Jadhav
Prataprao JadhavSarkarnama

मुंबई : राज्याप्रमाणे केंद्र सरकारमध्ये (central government) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट (minister) आणि एखादं राज्यमंत्रिपद किंवा राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्षपदही दिलं जाऊ शकतं. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदासाठी बुलडाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे लढताना आता केंद्रातूनही एकनाथ शिंदे यांना बळ मिळणार, हे उघड आहे. (Eknath Shinde group will get cabinet minister post in central government)

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडली. या बंडात तब्बल ४० हून अधिक आमदारांनी, तर १२ खासदारांनी शिंदे यांची साथ दिली आहे. बंडखोरीनंतर राज्यातील सत्तेत मुख्यमंत्र्यासारखं पद मिळवत वाटा मिळवला. पण केंद्रात शिंदे गटाला काय मिळणार, अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार आता केंद्रात शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Prataprao Jadhav
‘अरुणाचलप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील!’

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) भाजपचा सर्वात मोठा सहकारी हा शिंदे गट आहे. या गटाचे १२ खासदार भाजपसोबत आहे, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रात एखादं मंत्रीपद मिळू शकतं, असं सांगितलं जात होते. त्यानुसार शिंदे गटाकडून बुलडाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव केंद्रीय मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. या कॅबिनेट मंत्रीबरोबरच एखादं राज्यमंत्रीपद किंवा शासकीय समितीचं राष्ट्रीय पातळीवरील अध्यक्षपदही शिंदे गटाला देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Prataprao Jadhav
वसंतदादा पाटील यांच्या नातीचे डॉ. मधू पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एकनाथ शिंदे यांची राजकीय स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी, तसेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिंदे यांची शिवसेना उभी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंती अमित शहा यांच्याकडून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com