शिंदे गट व ठाकरे गट व्यासपीठावर एकत्र येणार ? कोकणात मुख्यमंत्र्यांसमोरच मुकाबला रंगणार ?

CM Eknath Shinde : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे व शिंदे गट संघर्ष पेटणार
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

रत्नागिरी : शिवसेनेत बंडखोरी उफाळून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार उध्दव ठाकरे यांची साथ सोडली होती. यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे गट संघर्ष सुरु आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाही.मात्र, उध्दव ठाकरे गट व आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौर्यावर जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी येथे 16 डिसेंबर रोजी 750 कोटींच्या विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नावं आहे. याचदरम्यान विकास उद्घाटनांच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे व शिंदे गट एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची चर्चा आहे. त्यामुळे या कार्यक्रमात दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Grampanchayat Election : आमदाराच्या प्रचारसभेत राडा; Bjp अन् Ncp च्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे सातत्याने भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. त्यांचे देखील या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आहे. तसेच एसीबीच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले राजन साळवी यांचंही नाव पत्रिकेत आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाचे हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे कोकणातील विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त शिंदे गट व ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Sanjay Raut News; अंधारेंवर बोलणारे राज्यपालांविषयी गप्प का?

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सामंतांचे तगडे नियोजन...

उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याची मोठी तयारी केल्याचे माहिती मिळत आहे. यासाठी २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांची विक्रमी सभा घेण्याची तयारी असल्याचे समजत आहे. एसटीच्या जवळपास १३० बस बुक केल्या आहेत. मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांच्याही स्वतंत्र गाड्या असणार आहेत.

राजन साळवी एसीबीच्या रडारवर

रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे लाचलुचपत विभागाच्या रडावर आहेत. रायगडमधील अलिबाग येथील लाचलुचपतच्या कार्यालयात राजन साळवी यांची बुधवारी(दि. 14) तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली. यावेळी राजन साळवी यांच्या समवेत उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिकांनी एसीबी कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी केली. साडेचार तास अधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यामध्ये राजकीय प्रवास, कौटुंबिक व्यवसाय आणि वाढलेल्या संपत्तीबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत. यानंतर साळवी यांनी न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. या चौकशीमध्ये वादग्रस्त काहीच आढळणार नाही. तक्रार देणाऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in