पालापाचोळा इतिहास घडवतो : ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर जोरदार टीका केली होती...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाची पालापाचोळा, अशा संभावना केल्यानंतर त्यावर तातडीने शिंदे यांनी थेट उत्तर दिले नाही. मुंबईत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोजक्या शब्दांत आपले प्रतिक्रिया दिली. मात्र नंतर आपण सविस्तर बोलणार असल्याचे सूचकपणे स्पष्ट केले.

आपल्या नेहमीच्या शैलीत बोलताना शिंदे म्हणाले की त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. आम्ही पालापाचोळा आहे, असे त्यांना वाटत असेल. पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे, अशा शब्दांत आपली भूमिका कायम ठेवली आहे.

एवढेच नाहीतर आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

कांदळवन संवर्धन कार्यक्रमातही शिंदे यांनी सूचकपणे भाषण केले. ते म्हणाले, ``26 जुलै अंतराष्ट्रीय कांदळवन साजरा केला जातो. या कांदळवनांकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं तिथे दिलं गेलं नाही. जिथे कांदळवन होतं तिथे नुकसान झालं नाही. आमचं हे सरकार पण मजबुतीने उभं राहिलेलं आहे. कसे आले तुम्ही पाहिले असेलच. पण कोणतही वादळ आलं तरी आम्ही हलणार नाही. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. त्यामुळे ते टिकणारच``

Eknath Shinde
महेश शिंदेंचे वजन वाढले : म्हणाले, ``कलेक्टरची एका झटक्यात बदली केली!``

शिंदे यांनी त्यानंतर बोरीवली पश्चिम येथील पोलिस वसाहतीची पाहणी केली. बोरीवलीतील नाटकवाला लेन, तहसीलदार ॲाफिस जवळ असलेल्या वसाहतीत ते गेले. पोलिसांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. पोलीस भरती देखील लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी बोलताना दिली.

पोलीस वसाहतींची माहिती घेतल्यावर त्यात राहणाऱ्या पोलीस कुटूंबियांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी लवकरात लवकर तुमच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल तसेच पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in