पटोलेंच्या कथित व्हायरल व्हिडीओवर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री शिंदेंनी जोडले हात!

नाना पटोले (Nana Patole) यांचा व्हिडीओ भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यानी ट्वीट केला आहे
Nana Patole, Eknath Shinde
Nana Patole, Eknath Shindesarkarnama

मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करुन या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) असल्याचा दावा केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारले असता, त्यांनी हात जोडले.

शिंदे हे सध्या कोणताच नवीन राजकीय वाद ओढवून घेण्याच्या फंदात पडणार नसल्याचे यातून स्पष्ट झाले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या नाना पटोले यांच्या या कथित व्हिडीओवरून टीका करत असल्या तरी त्यात पडण्यास शिंदे यांनी नकार दिला आहे. शिंदे हे शिवसेनेतील नेत्यांवरही थेट टीका करत नाहीत. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल तर फारसे बोलतच नाहीत. त्यामुळे नानांबद्दल सुरू झालेल्या नवीन वादावर त्यांनी लांबच राहणे पसंत केले.

शिंदे मुंबईमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींना नाना पटोले यांच्या व्हिडिओ बाबत प्रश्न विचारला. तो प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांनी हात जोडले. दरम्यान, चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटले होते, "काय नाना…तुम्ही पण, झाडी, डोंगार आणि हाटीलीत असे म्हणत त्यांनी पटोले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला"

Nana Patole, Eknath Shinde
भाजपने सत्ता मिळवण्यासाठी व विरोधी पक्ष संपवण्यासाठी लोकशाही अडचणीत आणली !

या व्हिडिओवरून नाना पटोलेंना नेटकऱ्यांनी आज चांगलेच ट्रोल केले. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी हे भाजपचे (BJP) कारस्थान असल्याचा आरोप करत, त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा कट-कारस्थान आहे. याबाबत आमच्या तक्रारी करणे सुरु झाले असून, निश्चित कारवाई होईल. या सगळ्या प्रकरणावर आपली लीगल टीम उत्तर देईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole, Eknath Shinde
संजय राऊतांचा बंडखोरांना टोला : आता ते म्हणतील आम्हीच बाळासाहेबांना शिवसेनेत आणले

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत पटोले यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्या म्हणाल्या, माझ्याकडे व्हिडीओ आल्यानंतर मलाही जरा आश्चर्याचा धक्का बसला. तो व्हिडीओ साध्या सुध्या माणसाचा नाही, तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आहे. त्यामुळेच मी थेट ट्विट करुन नानांना प्रश्न विचारला की, नाना हे काय आहे? मागच्या १० ते १२ दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यात नाना पटोलेंचा व्हिडीओ धक्कादायक आहे. भाजपच्या नेत्याचा अशाप्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या पक्षाने कारवाई केली, मात्र टीकेची धार कमी होताना दिसत नाही. तसेच हा व्हिडीओ जरी खासगी असला तरीही एखादी गोष्ट पब्लिकमध्ये आल्यानंतर ती खासगी राहत नाही, असे त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in