Eknath Shinde ठाम : शिवसैनिक भरडला गेलाय... महाविकास आघाडी सोडायलाच हवी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आवाहनला शिंदेंचा प्रतिसाद नाही.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath Shindesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन फेटाळून लावले आहे. `मी मुख्यमंत्री पदावर राहण्यास योग्य नाही, हे मला फक्त माझ्या शिवसेनेच्या एका आमदाराने सांगावे. मी पदाचा त्याग करेन,`असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले होते. त्यास एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले नाही. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिक भरडला गेल्याचे मुद्दा मांडला आहे. (Eknath Shinde Latest news)

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी सूचना शरद पवार यांनी ठाकरे यांना केल्याचे वृत्तही ठाकरेंच्या फेसबुक लाईव्ह नंतर पसरले होते. त्यामुळे तरी शिंदे आपली भूमिका मवाळ करतात का, याकडे लक्ष होते. मात्र त्यांनी महाविकास आघाडी सोडण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले.

त्यांनी चार मुद्यांद्वारे आपले म्हणणे मांडले आहे.

१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.

२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.

३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

हे चार मुद्दे पाहिले तर माघार घेण्याच्या मनःस्थितीत एकनाथ शिंदे नाहीत. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे आता शिवसेना नेतृत्वाला आव्हान राहणार असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे यांच्या म्हणण्यानंतर शिवसैनिकांची तीव्र प्रतिक्रिया आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज वर्षा या शासकीय निवासस्थानावरून निरोप घेणार होते. त्या वेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. उद्धव ठाकरे अंगार है... बाकी सब भंगार है, अशा घोषणा हे शिवसैनिक देत होते. शिवसेनेकडून अद्याप अधिकृतरित्या शिंदे यांना उत्तर देण्यात आलेले नाही.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
गुलाबराव 'सरकारनामा'शी बोलले : मी गुवाहटीला चाललो... हितं काय करू?

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी. एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in