Mumbai Cricket Association : डिनर डिप्लोमसी ? ; राज्यातील 'हे' तीन बडे नेते आज एकत्र येणार

Mumbai Cricket Association : राजकीय मतभेद विसरून राज्यातील दिग्गज राजकारणी अचानक एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 (Mumbai Cricket Association Election latest news)
(Mumbai Cricket Association Election latest news)sarkarnama

मुंबई : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर जूनमध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यातील प्रमुख पक्षांमधील कटुता वाढली आहे.राजकीय आखाड्यात उभे ठाकणारे तीन पक्षांचे प्रमुख आज (बुधवारी) एकत्र येत आहेत निमित्त आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच या तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येणार आहेत. (Mumbai Cricket Association Election latest news)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची उद्या (गुरुवारी) कार्यकारिणीची निवडणूक आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (बुधवारी) वानखेडे स्टेडिअमवर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्नेहभोजनासाठी एकत्र येत आहेत.

या निवडणुकीआधी डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार आशिष शेलार तसेच, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनल उभे केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच, फडणवीस यांच्या खास मर्जीतील अमोल काळे व बहुजन विकास आघाडीच्या अजिंक्य नाईक यांचा समावेश आहे.

राज्यात तीन महिन्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधक अन् सत्ताधारी यांच्यात रोज कलगीतुरा रंगत आहे. ठाकरे गट, शिंदे गट, आघाडी सरकारची एकमेंकांवर होत असलेली टीका, अंधेरी पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर हे तीनही नेते आज एकत्र येणार आहे.

यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीएवढेच अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे हेदेखील चर्चेत आहेत. काळे यांच्या पाठीशी राजकीय मतभेद विसरून राज्यातील दिग्गज राजकारणी अचानक एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर महापालिकेतील विद्युत कंत्राटदार ते मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असा प्रवास करणाऱ्या अमोल काळे यांच्याबद्दलचे कुतूहल वाढले आहे.

 (Mumbai Cricket Association Election latest news)
Raj Thackeray : 'सामना' ने पहिल्यांदाच उधळली राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं...

संघटनेच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य संदीप पाटील यांच्यात निवडणूक होणार आहे. दिग्गज राजकीय नेते काळे यांच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मूळ नागपूरकर असलेले काळे हे मागील काही वर्षांपासून संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com