Eknath Shinde : मध्यावधीची शक्यता? शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्याच्या 'टायमिंग'ची एकच चर्चा!

Eknath Shinde : शिंदे गटाकडून ठाकरे गटाकडे काही आमदारांचं इनकमिंग होणार का?
Eknath Shinde Uddhav Thackeray
Eknath Shinde Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा गुहाहाटी दौरा होणार आहे. आपल्या गटातल्या आमदारांना घेत शिंदे आता गुहाहाटीत दाखल होण्याची शक्यता आहे. मध्यावधी निवडणुका होणार, सरकार पडणार, असे विरोधक दावा करलत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या गुहाहाटी दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो.

विरोधकांकडून, महाविकास आघाडी पडणार असल्याचे वारंवार बोलले जात आहे. शिवसेनेत बंडपुकारून शिंदे समर्थक गुजरातच्या सुरतमध्ये आणि त्यानंतर आसाम राजधानी असलेल्या गुवाहाटीला मुक्काम ठोकला होता. यानंतर शिंदेंनी गुहाहाटी येथील कामाख्या देवीचे सर्व समर्थक आमदारांसह दर्शन घेत, सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात पुन्हा येणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

मुख्यमंत्रीपदाची शपथ पार पडल्यानंतर शिंदे यांनी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची घोषणा केली होती. या दौऱ्याचे आता नियोजन करण्यात येत आहे शिंदेंचे काही समर्थक गुवाहाटीला दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. गुहाहाटीच्या पुढच्या दौऱ्याची आखणी करत आहेत. शिंदेच्या काही खास आमदारांनीसुद्धा या दौऱ्याचे नियोजन करत आहेत.

Eknath Shinde Uddhav Thackeray
Andheri Election Result : चौदावी फेरी पुर्ण, ऋतुजा लटके 52 हजार 507 मतांनी आघाडीवर

ठाकरेंच्या मध्यावधी निवडणुकांच्या वक्तव्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या सरकार पडण्याच्या दाव्यानंतर आता शिंदे गट सतर्क झाल्याचे दिसत आहे. शिंदेंच्या या दौऱ्यावर टायमिंगबद्दल आता चर्चा होत आहे. खरंच आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाकडे काही आमदारांचं इनकमिंग होणार का? याच धास्तीने शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुहाहाटीला घेऊन चाललेत का? शिंदेंच्या गुहाहाटी दौऱ्याच्या टायमिंगबद्दल आता वेगवेगळ्या तर्क वितर्कांना चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com