Eknath Shinde : आशासेविका 'वर्षा'वर धडकणार!

Eknath Shinde : एक महिन्याचा वेतनाएवढे दिवाळीपूर्वी बोनस देण्याची मागणी!
Asha Sevika
Asha SevikaSarkarnama

पुणे : राज्यातील आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ ऑक्टोबर रोजी दुपारी भाऊबीजेच्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या वर्षा आणि आरोग्यमंत्र्यांच्या पुण्यातील निवासस्थानांवर ओवाळणीचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने देण्यात आली. यामुळे ऐन दिवाळीत आता या मुद्द्यावरून सरकारला या अनोख्या आंदोलनाला सामोर जावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

Asha Sevika
तेव्हा ३६ कोटी मिळायचे, आज ८०० कोटी!

राज्यातील गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांना सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, त्यांना एक महिन्याचा वेतनाएवढे दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, हा मोबदला दुपटीने वाढण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, प्रसूतीकाळात रजा मिळावी अशा विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी ११ ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढला होता.

त्यावेळी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकाच्या प्रतिनिधींची आरोग्यमंत्र्यांशी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत दिवाळीपूर्वी निर्णय जाहीर करू, असे आश्वासन दिले होते.

Asha Sevika
आशासेविकांच्या मागण्या रास्त, त्या मान्य केल्या पाहिजे

यानुसार संबंधित सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. परंतु या मागण्या मान्य न झाल्यास गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांकडून २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ओवाळणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडून मागण्यांच्या मान्यतेची भाऊबीज भेट मिळेल, असा विश्वास संघटनेचे एम. ए. पाटील, आनंदी अवघडे, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके आदींनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com