एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मोठी शक्ती; एकनाथ खडसे स्पष्टच बोलले!

Eknath Khadse Latest Marathi News : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर खडसे यांनी भाष्य केले आहे
Eknath Khadse
Eknath Khadsesarkarnama

डोंबिवली : राज्यात सुरू असलेले राजकारण पाहता, हा शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसत असले तरी शिंदे यांच्या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्या शक्तीमुळे हे घडत असावे, असे म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कल्याण येथे केले. (Eknath Khadse Latest Marathi News)

कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार सोहळा रविवारी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खडसे कल्याणमध्ये आले होते. खडसे म्हणाले, कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल. गेल्या ४० वर्षात अस राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कोणा बरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहे. तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल अशी स्थिती आहे. यामध्ये असे चित्र दिसतेय की एकनाथ शिंदे यांचं बंड म्हणा किंवा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो तांत्रिक बाबींची सोडवणून झाल्याशिवाय निकाली निघणार नाही.

Eknath Khadse
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे मात्र फडणवीसांची साथ देऊ नये

सत्कारा दरम्यान एकनाथ खडसे यांनी माझ्या मागे जी शक्ती आहे, जी ताकद आहे ती तुमची आहे. मला सर्वोच्च स्थानापर्यंत पोचविण्याचे काम तुम्हीं केले मी राज्याचा आमदार आहे. कधी ही मला बोलवा मी येईन येत्या काही महिन्यात महिन्यातून एकदा एक दिवस कल्याणमध्ये तूमच्या समस्या जाणून घेण्यासाठी असेन अस सांगितले.

प्रमाणिकपने काम केले तरी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतके छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही, मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाते हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलय. चौकशाझाल्या इथपर्यंत ठीक होत. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी यांच्या मागे चौकशी लावली. सगळ कुटुंब आठवड्याला इडी कार्यालयात बसते. मी काय गुन्हा केलाय, कुठे पैसे खाल्ले, काय घेतले तुम्ही दाखवा ना? असा भावनिक सवाल त्यांनी केला.

Eknath Khadse
एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी भोईरांच्या खांद्यावर?

पुढे बोलताना मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते गोठवले केले आता पैसे काढून टाकले, त्यानंतर राहते घरे दहा दिवसात खाली करण्याची नोटीस आली, असा नाथा भाऊने काय गुन्हा केला? न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतो. असे खालच्या स्तराचे राजकारण अनुभवले नव्हते. अस करायचे असते तर अनेकांना मला छळता आले असते, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुसऱ्यांना सहकार्याची भूमिका असते. न्यायालयाने संरक्षण दिले म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब जामिनावर बाहेर आहोत, नाही तर संपूर्ण कुटुंब तुरुंगात असते. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली, मदत केली नाही तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता, असे देखील ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in