ठाकूरांशी ३२ वर्षांपासूनचे संबंध विजयांचं गणित सोडवणार? भेटीनंतर खडसेंनी सांगितलं

एखनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली
ठाकूरांशी ३२ वर्षांपासूनचे संबंध विजयांचं गणित सोडवणार? भेटीनंतर खडसेंनी सांगितलं
Eknath Khadsesarkarnama

विरार : विधानपरिषद निवडणुकीच्या (Legislative Council election) पूर्वसंध्येला आज राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेतली. ठाकूरांच्या विरार येथील कार्यालयात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे म्हणाले, ठाकूर यांचे आणी माझे ३२ वर्षापासूनचे संबंध आहेत. मी त्यांच्याकडे मत मागायला आलो होतो. त्यांना विनंती केली आहे ते त्या संदर्भातील निर्णय घेतली, असेही खडसे यांनी सांगितले. तसेच ठाकूर यांच्याशी शेती विषयक खजूरांची चर्चा केली, असेही ते म्हणाले.

Eknath Khadse
फडणवीसांनी काढलेल्या अध्यादेशाकडे राज्य सरकारने साफ दुर्लक्ष केले..

यावेळी खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला भाजप तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत का? त्यावर खडसे म्हणाले, मला पाडण्यासाठी नाहीत तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भाजप आमचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे ते त्यांचा उमेदवार निवडून आण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील. भाजपमध्ये माझे अनेक समर्थक आहेत. मात्र, ते पक्ष सोडून मला मतदान करतील असे वाटत नाही. पण अनेकजण माझ्या संपर्कात आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत ठाकूरांच्या भेटीला शिवसेना (Shivsena) वगळता काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपच्या (BJP) उमेदवारांनी ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी गळ घातली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसून त्यांचा एक उमेदवार पडल्याने आता आघाडीतील दोन्ही काँग्रेसने पाठिंब्यासाठी अपक्षांच्या भेटी घेतल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 14 जून रोजी सर्वात आधी काँग्रेसचे भाई जगताप यांनी ठाकूर यांची भेट घेऊन बविआची 3 मत देण्याची विनंती त्यांनी केली होती.

Eknath Khadse
शेवटच्या क्षणी खडसेंची खेळी : ठाकूर कुणाला दणका देणार?

त्यानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी ठाकुरांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ठाकुरांची भेट घेतल्याने त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार हे मात्र, अजूनही गुलदस्त्यात राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in