Eknath Khadse News Update : एकनाथ खडसे ‘नॉटरिचेबल’ नव्हे; तर पाय दुखावल्याने रूग्णालयात!

Ncp News : आठ दिवसांपासून खडसे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून देण्यात येत आहेत.
Eknath Khadse News
Eknath Khadse News Sarkarnama

Eknath Khadse News Update : माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांचा पाय दुखावला होता. त्यावरील उपचारासाठी तीन-चारदिवस मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. त्यांना रग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या ते घरी उपचार घेत आहेत. या कारणामुळे त्यांचा फोन बंद असून ते नॉट रिचेबल नव्हे तर घरी विश्रांती घेत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नेहमीच संपर्कात असलेले तसेच एकाच रिंगमध्ये फोन घेणारे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसापासून ‘नॉट रिचेबल’असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

एकनाथ खडसे आठ दिवसापूर्वी नियमित तपासणीसाठी मुंबईत गेले होते. त्यावेळी त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कही झाला होता. त्यानंतर आठ दिवसांपासून खडसे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून देण्यात येत आहेत. या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून खडसे घरी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पायाची शिर दुखावली असल्याने त्यांना चालताना अडचण येत होती.

त्यावर उपचारासाठी ते मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तीन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले.आता त्यांची तब्बेत चांगली आहे. पायाचे दुखणे कमी झाले असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते घरीच असल्याचे निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.

Eknath Khadse News
Nana Patole News: शिक्षक, पदवीधरच्या उमेदवारांचे टेंशन; त्यात भंडाऱ्याचे प्रकरण, नाना दुहेरी संकटात !

याबाबत त्यांचे सहकारी राष्ट्रवादी कॉंगेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, कि, खडसे मुंबई येथे गेलेले असतांना त्यांच्या पायाला दुखापत झाली, त्यांच्या पायाची नस वर नस चढल्यामुळे त्यांना चालणे कठीण झाले त्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पीटलमध्ये तीन दिवस उपचार घेतले.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरीच विश्रांतीचा सल्ला दिला त्यामुळे ते मुंबईतच आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत, त्यांनी मोबाईलही स्वीच ऑफ केल्याचे त्यांनी सांगितले. आपला गेल्या तीन चार दिवसापासून संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला,पक्षाने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली, त्या ठिकाणी ते विजयी झाले. पक्षातर्फे अद्याप संधी दिलेली नाही. मात्र कायम कार्यकर्ते व जनतेच्या संपर्कात असणारे खडसे यांची संपर्क क्षेत्राबाहेर राहण्याची ही पहिलच वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, आता याबाबत खडसे यांच्याशी संपर्क झाल्यानतंरच खुलासा होवू शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com