मोदींच्या सत्तेची आठ वर्षे म्हणजे कुशासनच; जातीय सलोखा बिघडतोय...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेची आठ वर्षे म्हणजे कुशासनाची असून आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. (Mahesh Tapase News in Marathi)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज मोदीसरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारच्या पुढील आठ अपयशांची देशाला वारंवार आठवण येते असेही महेश तपासे म्हणाले.
यावेळी वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज यावर महेश तपासे यांनी प्रकाशझोत टाकला. मोदींच्या या ८ वर्षात देशाने खूप काही गमावले असून विज्ञान व समताऐवजी धर्म आणि जातीयवाद राज्य करत आहेत, असेही महेश तपासे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.