
मुंबई - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयामार्फत ( ईडी ) कारवाई सुरू झाली आहे. यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत उद्या ( ता. 22 ) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप व ईडीवर जोरदार टीका केली. या टीकेला भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी उत्तर दिले आहे. ( ED was most misused during Congress )
प्रवीण दरेकर म्हणाले, ज्याला कर नाही त्याला डर असण्याचे काही कारण नाही. अशा प्रकारे आंदोलनाची नौटंकी करून काही साध्य होणार नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा चौकश्यांना सामोरे गेले आहेत. त्यांनी तपास यंत्रणांना प्रतिसाद दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा साऱ्या तपास यंत्रणांना सामोरे जात प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. त्या निपक्षपातीपणे काम करत असतात. आपली न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा जाणिवपूर्वक कोणावरही कारवाई करत नसते, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटं. ईडीची स्थापना केव्हा झाली. ईडीमार्फत देशात कशा पद्धतीने राजकारण झाले कारवाया झाल्या. याचा पूर्व इतिहास काँग्रेसने तपासून पहावा. आपल्याला ईडीच्या कारवाया जाचक व्हायला लागल्यावर ईडीवर संशय व्यक्त करायचा. त्यांच्यावर टीका करायची. ईडीचा सर्वाधिक चुकीचा वापर काँग्रेसच्या काळात झाला. तपास यंत्रणांचे काम तपास करणे असते. त्यांना काही दोष देण्याचे कारण नाही. ते त्यांच्या कायद्याच्या चौकटीत काम करतात. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांना तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षवाढीसाठी लोकांत जावे लागते
काँग्रेस हतबल झाले आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करण्याची धमक व क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही. रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करताना ते दिसत नाहीत. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर येऊन टीका टिपण्णी करणे, पंतप्रधान मोदींना दोष देणे हे त्यांना सोपे काम वाटते. पक्षवाढीसाठी लोकांमध्ये जावे लागते. लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. तशा प्रकारची धमक काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. ते पोपटपंची शिवाय काही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.