Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी ED ची टीम थेट राऊतांच्या घरी पोहोचली

शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊतांच्या मैत्री बंगल्यावर आज ईडीचे (ED) पथक दाखल झाले आहे.काही महिन्यांपूर्वीचं पत्राचाळ प्रकरणात ED ने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावला होता. ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Sanjay Raut latest news)

कुटुंबीयांसमवेत संजय राऊत घरी आहेत. त्यांची अनेक प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. "मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही," असे ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी म्हटले होते.

ईडीने पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. शिवसैनिकांची राऊतांच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

sanjay raut
Deepak Kesarkar : राज्यपालांच्या विरोधात शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार

ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र तपासण्याचे काम सुरू आहे.

आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in