संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पुन्हा ईडीचे समन्स

संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : एकीकडे शिवसेनेतील आऊटगोईंग संपायचे नाव घेत नाही. दुसरीकडे त्यांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमिरा सुरुच आहे. पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. त्यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय राऊत यांची या आधीही ईडीने चौकशी केली आहे. या याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सहा तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र, आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

Sanjay Raut Latest Marathi News
होय,आम्हीच व्हिलन कारण गद्दारांवर अंधविश्वास टाकला...

मुंबईमधील गोरेगाव मधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sanjay Raut Latest Marathi News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यातील 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीकडून राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in