शिवसेनेवर संकटांचा डोंगर; संजय राऊतांना ईडीचं बोलावणं

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News
Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis NewsSarkarnama

मुंबई : आमदारांच्या बंडाने मोठं संकट कोसळलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना मंगळवारी (ता. 28) चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 39 आमदारांनी शिवसेनेविरोध (Shiv Sena) बंड केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकार अल्पमतात असल्याचा दावाही शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे. या स्थितीत राऊतांकडून बंडकोर आमदारांवर आसूड ओढले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत हेच शिवसेनेची बाजू प्रखरपणे मांडत आहे.(Maharashtra Political Crisis News)

Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News
खतांच्या टंचाईमुळे सहायक शिक्षक पाटलांचा थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन अन् लगेच केलं निलंबित

या राजकीय परिस्थितीत राऊतांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. सध्याच्या स्थितीत शिवसेनेसाठी राऊत हे महत्वाचे नेते बनले आहेत. शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत राऊत बंडखोर आमदारांना अंगावर घेत आहेत. तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते सध्या मैदानात असणं शिवसेनेसाठी महत्वाचे मानले जात आहे. राऊतांना मंगळवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावले आहे.


काय आहे प्रकरण?

पत्राचाळ य़ेथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com