ईडीच्या चौकशीला भावना गवळी हजर राहतील का ? ; किरीट सोमय्या म्हणाले..

चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे.
Bhavana Gawali,Kirit Somaiya
Bhavana Gawali,Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : ईडीनं अनेक वेळा समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना ईडीनं (ed) आज पुन्हा समन्स बजावलं आहे. त्यामुळे गवळी या आता तरी ईडीच्या चौकशीला हजर राहतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. (ED Summons to Bhavana Gawali news updates)

यापूर्वी त्यांना तीन वेळा ईडीनं नोटीस बजावली होती, पण काही कारणे सांगून गवळी या ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत. आता त्यांना चौकशीला हजर राहावं लागणार, अन्यथा त्यांच्याविरोधात ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"शंभर कोटींचा घोटाळा (money laundering) करणाऱ्या भावना गवळी गेले अनेक महिने ईडीच्या समोर जात नाहीत, आता परत समन्स निघाला आहे, यावेळी नाही गेल्या तर वॉरंट निघणार," असा दावा सोमय्यांनी केला आहे. याबाबत सोमय्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर केला आहे.

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. गवळी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

हरीश सारडा यांनी भावना गवळींची ईडीकडे तक्रार केली आहे.हरीश सारडा यांनी यांनी भावना गवळींची ईडीकडे तक्रार केली आहे. सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com