नवाब मलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाला ईडीचा दणका

लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे.
Nawab Malik News Updates
Nawab Malik News Updatessarkarnama

मुंबई : लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. मात्र, आता त्यांचे पुत्र फराज मलिक (Firaz Malik) यांच्या अडचणी वाढल्या. ईडीने (ED) फराज यांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यानंतर फराज यांच्या वकिलांनी ईडीकडे संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे फराज मलिक यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.

मंत्री मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. आता त्याचे पुत्र फराज मलिक यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. ईडीने फराज यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. ईडीकडून समन्स बजावूनही फराज चौकशीसाठी हजर झाले नाही. त्यांनी वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवडाभराचा वेळ मागितला होता. तशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ईडीने ती विनंती फेटाळून लावली.

Nawab Malik News Updates
नवाब मलिकांवरील कारवाईचा उद्याच होणार सोक्षमोक्ष!

नवाब मलिक सध्या ईडी कोठडीमध्ये आहे. मलिक यांना अटक झाल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्याच बरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही असे ते म्हणाले होते.

Nawab Malik News Updates
सोमय्यांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं अडचणीत वाढ

दरम्यान, मलिक यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे मलिक यांनी ईडीने दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. ईडीकडून झालेली अटक बेकायदा आहे. राजकीय सूडापोटी ही कारवाई केली आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com