देशमुख अन् मलिकांच्या बाबतीत ईडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी गॅसवर!

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी देण्यास ईडीचा विरोध
Anil Deshmukh |Nawab Malik
Anil Deshmukh |Nawab MalikSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारासमोर भाजपच्या उमेदवाराचे आव्हान आहे. यामुळे राजकीय गोळाबेरजेला गती आली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन हक्काच्या मतांबाबत ईडीच्या भूमिकेमुळे आघाडीचे टेन्शन वाढले आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) सध्या मनी लॅड्रींग प्रकरणात तुरुगांत आहेत. राज्यसभा निवडणुकीत त्यांनी मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीच्या वतीने न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. देशमुख आणि नवाब यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी ईडीने विरोध केला आहे.

Anil Deshmukh |Nawab Malik
बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला दांडी; हे आमदार देणार शिवसेनेची साथ

अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात 4 जून रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र, ईडीच्या उत्तरामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. तरी आता न्यायालय काय निर्णय देते याकडे आघाडीचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी आघाडीची धावपळ चालली आहे. भाजपने तीसरा उमेदवार दिल्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच एका-एका मतासाठी आघाडी आणि भाजपची धावपळ चालली आहे.

त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मताचे मोठे महत्त्व आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणे शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळे शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे.

Anil Deshmukh |Nawab Malik
काँग्रेसचे चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार! भाजप पुरस्कृत उमेदवाराचा गौप्यस्फोट

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला विधान भवनात मतदान होईल. त्यापूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आमदार १० जूनपर्यंत तेथे असतील. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, ही शक्यता गृहित धरुन शिवसेनेने ही रणनीती आखली आहे. त्यामुळे आता देशमुख आणि मलिक यांच्याबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com