मोठी बातमी : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना ईडीची नोटीस

कुंटे यांना अनिल देशमुख प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
Sitaram Kunte, Chief secretary
Sitaram Kunte, Chief secretarySarkarnama

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. थेट राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरण आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चौकशी प्रकरणात कुंटे यांची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिले आहे. कुंटे हे महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला.

Sitaram Kunte, Chief secretary
बोलावू तेव्हा हजर व्हा! 'एनआयए' न्यायालयाची भाजप खासदाराला तंबी

परमबीरसिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण बाहेर आहे. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. त्यामुळे राज्यभर वादळ उठलं.

ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या दोन खासगी सचिवांनाही अटक केली आहे. सीबीआयकडूनही खंडणी प्रकरणाचा तपास केला जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांनी राज्य सरकारला अहवालही सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित काळात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली त्यावेळी कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यांनी परवानगी दिल्याचा दावा शुक्ला यांनी केला होता. पण परवानगी घेताना शुल्का त्यावेळी खोटं बोलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे ईडीने कुंटे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com