राहुल गांधींची तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी : काँग्रेस आक्रमक, कार्यालयाबाहेर पेटवले टायर

नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने (ED) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दहा तास चौकशी केली.
राहुल गांधींची तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी : काँग्रेस आक्रमक, कार्यालयाबाहेर पेटवले टायर
Rahul Gandhi Latest Marathi Newssarkarnama

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने (ED) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दहा तास चौकशी केली. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशी बोलवण्यात आले, त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. (Rahul Gandhi Latest Marathi News)

Rahul Gandhi Latest Marathi News
ईडीचे प्रश्न संपेना; राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशीही चौकशीला हजर राहण्याचे आदेश

या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले. यामुळे पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) व राहुल गांधी यांना समन्स जारी केला होता. गांधी यांना १३ जूनला दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. त्यानुसार राहुल गांधी १३ जून आणि १४ जून रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले.

त्यानंतरही राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पुन्हा बोलावण्यात आले आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी बाहेर टायर पेटवले आहेत.

Rahul Gandhi Latest Marathi News
शरद पवार हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? : ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत घेतली भेट

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर दबाव आण्ण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in