१३ तासांच्या चौकशीनंतर परब म्हणाले, सगळ्याचा खुलासा न्यायालयात होईल

राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab)यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने आज सकाळ छापेमारी केली.
१३ तासांच्या चौकशीनंतर परब म्हणाले, सगळ्याचा खुलासा न्यायालयात होईल
Anil Parab ED Raid news updatesarkarnama

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने आज सकाळ छापेमारी केली. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू केले होते. सकाळी सहा वाजता ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहचले होते. तब्बल १३ तासानंतर ईडीचे (ED) अधिकारी परब यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. (Anil Parab ED Raid news update)

या चौकशीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परब म्हणाले, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकलेले आहेत. गेल्या काही दिवसापासून या ईडीची कारवाई होणार म्हणून बातम्या येत होत्या. साई रिसॅार्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी न्यायालयात दावा केलेला आहे. हे सगळे असताना हे रिसॅार्ट चालू झालेले नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाची दोन कलमे लावून. रिसॅार्टचे पाणी समुद्रात जाते, अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे.

Anil Parab ED Raid news update
तब्बल १३ तासानंतर परबांची चौकशी संपली; ईडीने काही कागदपत्रे घेतली ताब्यात

रिसॅर्ट चालू नसतानाही, माझ्यावर छापेमारीची कावारई केलेली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेले आहेत. यापूर्वी देखील उत्तरे दिलेली आहेत. यापुढे देखील प्रश्न विचारले तरी उत्तरे देण्याची माझी तयारी आहे. या सगळ्याचा खुलासा न्यायालयात होईल. प्रत्येक गोष्ट कायद्याला समोर ठेवून करत असतो. आजची जी चौकशी होती ती रिसॅार्टच्या संदर्भातील होती. मनी लॅंड्रींगच्या बाबतीत चौकशी नाही. ज्या वेळी रिपोट येतील तेव्हा त्यावर उत्तर देऊ. काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. छापे पडलेल्या लोकांचा रिसॅार्टशी काहीही संबंध नाही, असे परब यांनी सांगितले.

Anil Parab ED Raid news update
रूपाली चाकणकर मंदिरात गेल्या, तेवढ्यात विद्या चव्हाणांनी व्यासपीठ सोडले; गटबाजीने पदाधिकारी हैराण!

दरम्यान, अनिल देशमुख, नवाब मलिक, यांच्यानंतर ईडीने महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असलेले अनिल परब यांच्यावर छापेमारी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे संजय कदम यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी परब यांच्या घराबाहेर जमून घोषणाबाजी केली. आयकर विभागानेही काही दिवसांपूर्वी कदम याच्या घरावर छापेमारी केली होती. तब्बल १३ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांच्या बंगल्यावर चौकशी केली. ईडीचे अधिकारी तासिन सुलतान हे स्वत: या कारवाईत सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in