Anil Parab, Kirit Somaiya News
Anil Parab, Kirit Somaiya NewsSarkarnama

Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांचा फुसका बार; ईडीच्या आरोपपत्रात तर अनिल परबांचे नावच नाही

Anil Parab News : दापोलीतील साई रिसॉट प्रकरणी ईडीने आरोपत्र दाखल केले आहे.

Chargesheet filed on ED in Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉट प्रकरणी ईडीने आरोपत्र दाखल केले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या मुद्यावरून राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात आरोपांच्या फौरी झडल्या होत्या.

साई रिसॉट प्रकरणी भाजपाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. ईडीने (ED) या प्रकरणात चौकशीनंतर कारवाई केली होती. साई रिसॉट प्रकरणी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली होती. त्याशिवाय या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

Anil Parab, Kirit Somaiya News
Rahul Narvekar News : सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांचा लंडन दौरा; राजकीय वर्तुळात काय घडतेय?

साई रिसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह चार जणांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा ईडीला आहे.

या आरोपपत्रात सध्या सहा आरोपींची नावे आहेत. मात्र, अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात कोणताही आरोप केलेला नाही. परबांच्या सहभागाचा आरोपपत्रात वारंवार उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, थेटपणे परब यांच्यावर आरोप केलेले नाहीत. आरोपपत्रात एकूण 13 साक्षीदारांचा उल्लेख आहे. तर पंच साक्षीदारांसह 20 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत.

Anil Parab, Kirit Somaiya News
Eknath Shinde News : अॅड. असिम सरोदेंच्या दाव्याने खळबळ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार?

आरोप पत्रामध्ये मुरुड, दापोली येथे 1 एकर जमीन होती. सदानंद कदम यांनी परब यांच्या सांगण्यावरून हा सर्व व्यवहार केला. मूळ सौदा 1 कोटी 80 लाख रुपयांत झाला. त्यापैकी 80 लाख रोख स्वरूपात दिले. हा भूखंड 'सीआरझेड-3' मध्ये आहे. त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन आहे. अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी जमिनीचा ताबा घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com