'त्या' नादात तुम्ही लवकरच रनआऊट व्हाल : राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी 'बुलेट ट्रेन' चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाहीत.
Mahesh Tapase-Eknath shinde
Mahesh Tapase-Eknath shindeSarkarnama

मुंबई : कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ‘ईडी’ (एकनाथ शिंदे Eknath Shinde-देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis) सरकार लवकरच 'रनआऊट' होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. (ED government will soon be 'run out' in its drive to score more runs off fewer balls : Mahesh Tapase)

मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा करायच्या आहेत, असे वक्तव्य केले होते. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तपासे यांनी समाचार घेतला आहे. राजकीय लालसेपोटी राज्यातील ईडी सरकारकडून चुकीचे धोरण तर स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे, असे तपासे यांनी नमूद केले आहे.

Mahesh Tapase-Eknath shinde
‘शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला; पण...’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी 'बुलेट ट्रेन' चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाहीत, असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तपासे यांनी म्हटले आहे.

Mahesh Tapase-Eknath shinde
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

एकीकडे न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे शिवसेनेला (ठाकरे गटाला) मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर 'सी वोटर' चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्व्हे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार सध्या वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली आहे, त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेले शिंदे सरकार जास्त काळ टिकेल, असे वाटत नाही, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in