संजय राऊतांच्या अटकेची ईडीने सांगितली 'ही' तीन कारणे

Sanjay Raut | shivsena| शिवसेना खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने (ED)अटक केली
Sanjay Raut | shivsena|
Sanjay Raut | shivsena|

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने (ED)अटक केली. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीने राऊतांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे दावा केला आहे. संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. अशा शिवसेनेतील बंडखोरीनंतर संजय राऊतांकडून शिंदे गट आणि भाजपवर वारंवार टीका करताना दिसत होते.

त्यांच्या टीकांमुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्यांचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या न्यायालयातील सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचंही लक्ष लागले आहे. पण संजय राऊत यांना नक्की कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली, याची कारणं ईडीकडून सांगण्यात आली आहेत.

Sanjay Raut | shivsena|
ठाकरेंना समर्थन देणाऱ्या शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ; ऑडियो क्लिप व्हायरल

ईडीने केलेल्या तपासात असहकार, बेहिशेबी रोकड जप्त आणि संशयास्पद कागदपत्र आढळल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हीच तीन कारणे ईडीने दिली आहेत. ईडीचे अप्पर संचालक सत्यव्रत कुमार यांनी रविवारी (३१ जुलै) संजय राऊतांच्या अटकेच्या मेमोवर स्वाक्षरी केली. आजही सत्यव्रत कुमार इतर अधिकाऱ्यांसह राऊतांची अधिक चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर, ईडीने ज्या साक्षीदारांचे जबाब आणि मनी ट्रेलशी संबंधित पुराव्यांशी राऊतांचा जबाब जुळत नसल्याने ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून याच मुद्यांच्या आधारे ईडी कोठडी मागणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या अटकेवर त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''संजय राऊतांना (Sanjay Raut)बोगस केसमध्ये अटक केली. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा करुन भाजपकडून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडणं आणि शिवसेना संपवण्याचे हे प्लॅनिंग आहे. भाजप सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in