देशमुखांसह त्यांचे दोन पुत्र अडचणीत; 'ईडी'कडून तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने (ED) आरोपपत्र दाखल केले आहे.
Anil Deshmukh

Anil Deshmukh

Sarkarnama

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने (ED) आरोपपत्र दाखल केले आहे. यात देशमुख हे मुख्य आरोपी असून, त्यांचे पुत्र हृषिकेश आणि सलील यांचीही नावे यात आहेत. करचुकवेगिरी प्रकरणी तब्बल सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात सुमारे डझनभर आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचे जबाब आहेत.

देशमुखांच्या विरोधातील आरोपपत्रात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचे जबाब आहेत. याचबरोबर सुमारे डझनभर आयपीएस अधिकाऱ्यांचेही जबाब आहेत. देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांनी हव्या त्या ठिकाणी बदल्या मिळवल्याचा आरोप आहे. याचवेळी ईडीला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाची प्रत मिळू शकलेली नाही.

देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबरला अटक केली असून, ते सध्या हे आर्थर रोड कारागृहात आहेत. या प्रकरणी हे पुरवणी आरोपपत्र आहे. ईडीने पहिले आरोपपत्र ऑगस्ट महिन्यात दाखल केले होते. ईडीने देशमुखांची नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्था, त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि सहाय्यक कुंदन पलांडे यांच्यासह इतरांवर पहिले आरोपपत्र दाखल झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Anil Deshmukh</p></div>
कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली अन् नारायण राणेंची ठाम भूमिका..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक केली होती.

<div class="paragraphs"><p>Anil Deshmukh</p></div>
नितेश राहिले बाजूला आता नारायण राणेच आले अडचणीत!

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (cbi) प्राथमिक तपासात क्लीन चीट दिल्याचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने देशमुखांच्या चौकशीचे आदेश नुकतेच दिले आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांना आरोपी बनवलेले नसले तरी ते मोठ्या कटाचा भाग असू शकतात. कारण, त्यांना या प्रकरणातील माहिती लीक झाल्याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com