ED ची मोठी कारवाई ; अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत

जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींहून अधिकची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
ED ची मोठी कारवाई ; अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत
Jacqueline Fernandezsarkarnama

मुंबई : : राज्यात आज केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबई आणि पुण्यात आठ ठिकाणी छापे टाकले आहेत. पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर आज सकाळी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला. येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई सुरू आहे.

अशातच बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर ईडीनं (ED) कारवाईचे केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केल्याचे समजते.

जॅकलिन फर्नांडिसची सात कोटींहून अधिकची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत. भेटीपोटी मिळालेल्या वस्तू या गुन्ह्यातून होत्या. या भेटवस्तू आणि मालमत्ता सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्या होत्या, असे सुत्रांनी सांगितले.

Jacqueline Fernandez
MPSC : टेम्पो चालकाचा मुलगा राज्यात प्रथम ; अथक मेहनत घेऊन प्रमोद चौगुलेने मारली बाजी

सुकेश चंद्रशेखर याचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश आहे.त्याच्याशी संलग्न मालमत्ताबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.जॅकलिन फर्नांडिसने हिच्या संमतीशिवाय सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जॅकलिन अधिक चर्चेत आली. काही महिन्यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं दिल्लीत जॅकलिन फर्नांडिसची सुमारे पाच तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात तिला समन्स बजावण्यात होते.

Jacqueline Fernandez
बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल

सुकेश चंद्रशेखरचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबर संबंध असल्याचं समोर आलं आहे. प्रामुख्यानं जॅकलिन फर्नांडिसचं नाव यात समोर आलं. तसंच नोरा फतेहीसह इतरही काही सेलिब्रिटींशी त्यांचा संबंध असल्याचंही तपासात समोर आलं होतं. तो या सेलिब्रेटीजला महागड्या भेटवस्तू पाठवत असे. सुकेश चंद्रशेखरला मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक झाली होती. त्याने अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.