शिवसेनेच्या बड्या नेत्याला 'ईडी'चा दणका! तब्बल 11.35 कोटींच्या मालमत्तेवर टाच

शिवसेनेचे बड्या नेत्याला सक्त वसुली संचालनालयाने दणका दिला आहे.
Uddhav Thackeray and Pratap Sarnaik
Uddhav Thackeray and Pratap SarnaikSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) गैरव्यवहार प्रकरणी सरनाईकांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. सरनाईक यांचे दोन फ्लॅट आणि एक भूखंड अशी 11.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यातच आली आहे. यामुळे पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 30 सप्टेंबर 2013 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एनएसईएलच्या सदस्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आणि कर्ज फेडण्यासाठीही वापरले, असे चौकशीत समोर आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एनएसईएलचे महत्वाचे अधिकारी आणि 26 कर्जबुडव्यांचा समावेश होता. त्यांनी 13 हजार गुंतवणूकदारांना 5 हजार 600 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

Uddhav Thackeray and Pratap Sarnaik
शेट्टींनी पक्षातून हकालपट्टी करताच आमदार भुयारांनी एकाच शब्दात दिलं उत्तर

आस्था ग्रुपने एनएसईएलकडून 242.66 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आस्था ग्रुपने यातील 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्ट्स एलएलपी कंपनीत वळवले. या कंपनीला मिळालेल्या रकमेपैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्रायझेस आणि या विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांत वळवण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत 3 हजार 242 कोटी रुपयांची मालमत्ता आधी जप्त केली होती. आता एकूण जप्त मालमत्तेचे मूल्य 3 हजार 254 कोटी रुपयांवर गेले आहे.

Uddhav Thackeray and Pratap Sarnaik
राजू शेट्टींचा दे धक्का! आपल्याच एकमेव आमदाराला दाखवला बाहेरचा रस्ता

कारवाईवर सरनाईक म्हणाले...

यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, ईडीने गेल्या आठवड्यातील माझे राहते हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केला आहे. मला आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस पाठवलेली आहे. त्या नोटिशीला मी कायदेशीर उत्तर दिले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती. पहिल्यांदा 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर कारवाई झाली होती. आता 2022 मध्येही ही कारवाई सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com