जावयानंतर एकनाथ खडसेही अडचणीत; गुरूवार ठरणार महत्वाचा  - ED arrested Girish Chaudhri in a Money laundering case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जावयानंतर एकनाथ खडसेही अडचणीत; गुरूवार ठरणार महत्वाचा 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जुलै 2021

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी (Girish Chaudhri) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यांना विशेष न्यायालयानं येत्या 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता एकनाथ खडसेही (Eknath Khadse) अडचणीत आले आहेत. ईडीने त्यांना समन्स बजावले असून गुरूवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे. त्यामुळे खडसेंसाठी गुरूवार महत्वाचा ठरणार आहे. (ED arrested Girish Chaudhri in a Money laundering case)

हेही वाचा : राजीनामा मागितला नाही, मीच दिला! काही तासांतच चुकीची दुरूस्ती

भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरून खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांचे जावई व पत्नीचेही या प्रकरणात नाव आहे. यापूर्वीही ईडीने खडसे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी रात्री ईडीकडून जावई चौधरी यांची कसून चैाकशी केली जात होती. आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर 12 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

त्यानंतर लगेचच ईडीकडून एकनाथ खडसे यांनाही नोटीस बजावण्यात आली. गुरूवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यात आले आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढणार आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली.ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.  

खडसे यांनी मात्र जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मुळ जमीनमालकच या जमिनीचा मालक आहे. त्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतलेला नाही. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्याने कुणीही जमी विकत घेऊ शकतो. हे कायदेशीरच आहे.

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली होती. आपल्यामागे ईडी लावल्यास सीडी लावेन, अशा इशारा त्यांनी दिला होता. खडसे यांच्या या वक्तव्याची त्यावेळी बरीच राजकीय चर्चा झाली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख