ED News : आयकर विभागाचा 'अधिकारी' ED च्या जाळ्यात ; महागड्या गाड्या, सदनिका जप्त, 263 कोटींची फसवणूक

ED News : . जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये लक्झरी कार BMW X7, Mercedes GLS400d, Audi Q7 चा समावेश आहे.
ED News
ED Newssarkarnama

ED News : राजकीय व्यक्तीवरील छापेमारीनंतर ईडीने आपला मोर्चा आता सरकारी अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. (income tax refund scam case news update)

एका आयकर विभागाच्या (income tax) अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉग इन वापरून टॅक्स रिफंडच्या (income tax refund scam case) माध्यमातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर ईडीनं कारवाई केली आहे.

आयकर परताव्या बाबत केलेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत तसेच कर्नाटकातील उडुपी येथील जमिनी जप्त केल्या आहेत.

ईडीने कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठी छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्याच एका कर्मचाऱ्याने सरकारला 263 कोटींचा चुना लावल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला आहे.

'तानाजी मंडल अधिकारी' असे आयकर विभागाच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.त्यांच्याकडून महागाड्या गाड्या, सदनिका अशी बक्कळ संपत्ती जमा केली आहे.आयकर खात्यात वरिष्ठ सहाय्यक पदावर तानाजी अधिकारी हे कार्यरत आहेत. मालमत्तांमध्ये लक्झरी कार BMW X7, Mercedes GLS400d, Audi Q7 चा समावेश आहे.

ED News
Sharad Pawar News : 'पहाटेच्या शपथविधी'वर शरद पवारांनी मौन सोडलं ; म्हणाले..

नोव्हेंबर 2019 पासून वर्षभरात 12 खोटे टॅक्स रिफंड क्लेम तानाजी अधिकारी याने मंजूर केले. या सर्व टॅक्स रिफंडच्या माध्यमातून जवळपास 263 कोटी रुपये तानाजीने एस.बी. एंटरप्रायझेसच्या बँक खात्यात वळते केले. 2007-08 आणि 2008-09 या आर्थिक वर्षातील टॅक्स रिफंड बाकी असल्याचे दाखवून तानाजी अधिकारी याने 263 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करुन..

आपल्या वरिष्ठांशी गोड बोलून अधिकारी याने त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यांचा फायदा घेत त्याने आयकर विभागातील लॉन इन आणि पासवर्ड मिळवले. याचा गैरवापर करुन त्याने खोटे कर परतावे अर्थात टॅक्स रिफंड करत असे.आपल्या सहकाऱ्यांना खोटे टॅक्स रिफंड क्लेम दाखल करायला तो सांगत असे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉग इन वरून ते मंजूर करीत असे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com