आधी कोठडीतलं जेवण खा, नंतर घरच्या जेवणाचं बघू!

अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी देशमुखांच्यावतीने कोठ़डीत घरचे जेवण मिळण्याची विनंती करण्यात आली होती. पण न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली आहे. ‘आधी कोठडीतलं जेवण खा, नंतर घरच्या जेवणाचा विचार करू,’ असं सांगत न्यायालयाने देशमुखांना सध्यातरी घरचं जेवणाला परवानगी देण्यास नकार दिला.

मनी लाँर्डिंग प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुखांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. ते आतापर्यंत ईडीच्या कोठडीत होते. देशमुखांकडून न्यायालयात काही मागण्याही करण्यात आल्या होत्या. देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, ही विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. ईडी कोठडीत देशमुखांना घरचे जेवण देण्याची परवानगी मिळाली होती.

Anil Deshmukh
जमिनीवर झोपताना पाठीला त्रास होतो, बेड द्यावा! देशमुखांना 14 दिवसांची कोठडी

त्याचप्रमाणे देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनीवर झोपताना पाठीला वेदना होतात. त्या़चे वय आणि डाँक्टरांचा सल्ला लक्षात घेता बेडची मागणी मान्य करावी, असा अर्ज त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. हा अर्ज मात्र न्यायालयाने मान्य करत देशमुखांना बेड देण्याला परवानगी दिली. दरम्यान, मागील सुनावणीवेळी ईडीने या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले होते. अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने अनिल देशमुखच्या (anil deshmukh) ईडी कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडीने ED)आज न्यायालयात केली होती. त्यानुसार तीन दिवस ईडी कोठडीत वाढण्यात करण्यात आली होती. ही कोठडी सोमवारी संपणार होती.

Anil Deshmukh
एसटी संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; विलीनीकरणावर मांडली रोखठोक भूमिका

मागील सुनावणीवेळी देशमुखांनी न्यायाधीशांना लेखी पत्र दिलं होतं. ''दहा दिवसापासून ईडीनं मला कोठडीत ठेवलं आहे. या दरम्यान मला दोनशेहून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मात्र जे ईडीला अपेक्षित आहे, त्यासंदर्भात माझ्याकडे आता सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे मला आता ईडीची कोठडी दिली जाऊ नये,'' अशी विनंती देशमुखांनी केली होती. पण त्यांची ही विनंती फेटाऴण्यात आली होती.

''सचिन वाझे याची कोठडी संपल्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करता येईल. गरज पडल्यास त्यावेळी अनिल देशमुखांची कोठडीही नंतर न्यायालयाच्या परवानगीने घेता येईल. सचिन वाझे सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत आहे, उद्या त्याची रिमांड वाढवली तर?,” असा सवाल देशमुखांचे वकील विक्रम चौधरी यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com