'दसरा मेळावा' शिवतीर्थावरच : उद्धव ठाकरेंचा निर्धार

Uddhav Thackeray : शिवसैनिकांना कामाला लागण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात वाद प्रतिवाद होत आहेत. शिवसेना आणि शिंदे गट यांच्याच वाद घडताना दिसून येत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा होऊच नये, यासाठी शिंदेचे गटाचे आमदार आणि भाजप प्रयत्न करत असल्याचा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहे.

शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना व आदेश दिले. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी रणनीती संदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. शिवतीर्थावर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार. कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 Uddhav Thackeray
Shivsena|काहीही झालं तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार: सुनील प्रभुंनी ठणकावलं

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातून फुटलेल्या नेत्यांवरही सडकून टीका केल्याचे समजते. शिवसेना फोडण्याआधी एकदा इतिहास जाणून घ्या. फुटलेले सगळे तोतया आहेत. मतदार जनताच त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

दरम्यान, यावेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. वेदांता प्रकल्प दोन महिन्यात गुजरातला गेलाच कसा? गुजरातकडे हा प्रकल्प गेला, त्यावेळी राज्य सरकार काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मोठे नुकसान झाले. आम्ही हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून प्रयत्न केले होते, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com