दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली : शिवसेना-शिंदे गटातील राडा कारणीभूत!

Dasara Melava : मुंबई पोलिसांनी दिलेला अभिप्राय यासाठी कारण देण्यात आले.
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Shivsena News
Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Shivsena NewsSarkarnama

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद घडून येत आहे. मात्र आता याबाबत मोठा निर्णय समोर आला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या माध्यमातून केलेले दोन्ही अर्ज महापालिकेने नाकारले आहेत. यामुळे आता हा वाद शिवसेनेकडून उच्च न्यायालयात गेले आहे. यासंदर्भात न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेना अणि शिंदे गटात हाणामारीची घटना घडली होती. दोन्ही गटातील याच हाणामारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन्ही गटाला मुंबई महापालिकेने गुरुवारी सकाळी पत्र पाठवून दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्याची बाब कळवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Shivsena News
उद्धव ठाकरे गटाला मुंबईतून जनताच हद्दपार करेल : भाजप प्रवक्त्याची टीका

मुंबई महानगरपालिकेमार्फत पाठवण्यात आलेल्या पत्रात परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला अभिप्राय यासाठी कारण देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचे पालिकेनं म्हटले. शिवाजी पार्क परिसरात दोन्ही गटात झालेल्या राड्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. यावर आता शिवसेनेकडून कशा पद्धतीने प्रतिक्रीया उमटतात हे पाहणे, महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com