फडणविसांच्या कार्यालयामुळे २० वर्षानंतर पेंशन जमा झाली अन् अनुसयाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले

ही पेन्शन थोडी थोडकी नव्हे, तर दरमहा तब्बल २६ हजारांहून अधिक रक्कम त्यांना मिळणार आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांच्या कार्यालयाच्या संवेदनशीलतेमुळे गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकाच्या ८७ वर्षीय पत्नीचा पेन्शनचा लढा तब्बल २० वर्षानंतर यशस्वी झाला. लालफितशाहीच्या कारभारामुळे प्रलंबित असलेली अनुसयाबाई वैजनाथ नवले (Anusayabai Vaijnath Navale) (रा. सेलू, जि. परभणी) यांची पेन्शन सुरू झाली.

Devendra Fadanvis
‘आदिनाथ’साठी सावंतांनी ९ कोटी रुपये भरले; बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ही पेन्शन थोडी थोडकी नव्हे, तर दरमहा तब्बल २६ हजारांहून अधिक रक्कम त्यांना मिळणार आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसैनिकाच्या थकलेल्या पत्नीला तिचा न्याय्य हक्क मिळाला आहे.

अनुसयाबाई यांचे पती वैजनाथ खेमजी नवले हे गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. घरावर तुळशीपत्र ठेऊन गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच्या लढ्यात भाग घेतला. त्यांचे १९९४ साली निधन झाले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांसाठी २० जून २००३ पासून पेन्शन योजना सुरू केली होती.

Devendra Fadanvis
शंभुराज देसाईंनी सांगितले शिंदे सरकारचे वास्तव; राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीत

या योजनेत स्वातंत्र्यसैनिकांच्या पश्चात पत्नीलाही आयुष्यभर पेन्शन देण्याची तरतूद आहे. ही माहिती मिळाल्यावर अनुसयाबाई यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला. मात्र, हा प्रस्ताव पुढे गेला नाही.

दिल्ली येथे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना या आजींच्या लढ्याची- धडपडीची माहिती मिळाली. त्यांनी गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्यसैनिक पेन्शन विभागाशी संपर्क साधून अनुसयाबाई यांची भेटीची वेळ ठरविली. संबंधित अधिकाऱ्याला सर्व प्रकरण सांगितले. या अधिकाऱ्याने त्यांची आस्थेने विचारपूसही केली आणि तातडीने त्यांचे काम मार्गी लागले.

त्यानंतर संबंधित विभागाकडून याबाबतचे आदेश निघावेत, यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा चालूच ठेवला. अखेर २६ ऑगस्ट रोजी अनुसयाबाई यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. मनोज मुंडे यांनी नातवासारखी काळजी घेतल्याने या आजी भारावून गेल्या. त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचे मनोमन आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com