अन्... केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड त्याच्यासाठी देवदूतासारखे धावून आले

Dr. Bhagwat Karad |Delhi| डॉ. भागवत कराड गुरुवारी (ता.१६) राजधानी दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले होते.
अन्... केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड त्याच्यासाठी देवदूतासारखे धावून आले
Dr. Bhagwat Karad

मुंबई : जगात कोरोना महामारीने थैमान घातले होते. पण त्या महामारीत डॉक्टर्स अहोरात्र रुग्णांची सेवा करत होते. एखाद्या देवदुताप्रमाणे जगभरातील डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर दिवसरात्र उपचार केले. अनेक रुग्णांनी आशा सोडली पण डॉक्टर्स शेवटपर्यंत उपचार करत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेदेखील त्या देवदुतांपैकी एक म्हणावे लागेल. (Dr. Bhagwat Karad news)

डॉ. भागवत कराड यांचा असाच एक व्हिडीओ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचं काय झालं, डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) गुरुवारी (ता.१६) राजधानी दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रम सुरु असताना समोर असलेल्या कॅमेरामनला अचानक त्रास जाणवू लागला आणि काही क्षणातच तो खाली कोसळला.

Dr. Bhagwat Karad
विधान परिषद : हायकोर्टाचा निर्णय येताच भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या..

डॉ. भागवत कराड यांनी त्याच वेळी कार्यक्रम थांबवला आणि त्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार करत त्याला शुद्धीवर आणले. त्याला धीर देत त्याची विचारपूस केली. त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना केली. डॉ. भागवत कराड यांनी तातडीने बेशुध्द पडलेल्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार करीत त्यांचा जीव वाचवला. त्याच्यावर तातडीने उपचार मिळल्यामुळे या कॅमेरामनचा जीव वाचल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.

अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वीही विमान प्रवास करताना त्यांनी प्रोटोकॉलची चिंता न करता एका प्रवाशाचा प्राथमिक उपचार करुन जीव वाचवला होता. इंडिगोच्या दिल्ली-मुंबई फ्लाइटमधून डॉ. भागवत कराड मुंबईला येत होते. त्यावेळी अचानक मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक त्रास होऊ लागला आणि तो सीटवरून खाली पडला. हे पाहताच विमानातील क्रूने डॉक्टरांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. रुग्णांची अडचण लक्षात येताच डॉ. कराड धावत त्याच्याजवळ पोहोचले.

Dr. Bhagwat Karad
नुपूर शर्मांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून

याच घटनेचा व्हिडीओ फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरुन शेअर केला आहे. ' माणुसकी सर्वकाही! डॉक्टर देवदूत का आहेत? अजून एक प्रेरणादायी उदाहरण आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी घालून दिले आहे. डॉ. भागवत कराड यांनी टीव्ही मुलाखतीदरम्यान बेशुद्ध पडलेल्या कॅमेरामनला तत्काळ आराम देऊन आपले कर्तव्य पार पाडले. सलाम, डॉ कराड जी!" असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

डॉ.भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीवर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री असल्याचा प्रोटोकॉलही मोडला. डॉक्टर या नात्याने रुग्णाचा जीव वाचवणे हे त्यांनी आपले आद्य कर्तव्य समजले. रक्तदाबाच्या समस्येमुळे प्रवाशाला चक्कर आली होती. डॉ कराड यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रवाशाला बरं वाटू लागलं, असे त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in