महागाई इतकी वाढू देऊ नका की लोकांना 'राम नाम सत्य' म्हणावं लागेल

मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली.
 Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई - राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रम झाला. या उपक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांशी बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली. ( Don't let inflation rise so much that people have to say 'Ram Naam Satya' )

मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोण अयोध्येत गेला काय अथवा राममंदिरात गेला काय. सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा सवालही मंत्री आव्हाड यांनी उपस्थित केला.

 Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे फिरकलेही नाही!

ते पुढे म्हणाले, महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसे बोलू नये यासाठी हे सर्व केले जात आहे. त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय आणि आम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकायचे नाही. आम्ही फक्त महागाईवर बोलणार. ते कुठेही जाऊदेत आम्हाला काही करायचे नाही. मात्र एक लक्षात ठेवा लोक आज 'श्रीराम' म्हणतायत... महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना 'राम नाम सत्य' आहे म्हणावं लागेल असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

 Jitendra Awhad
Video : लोकांची माथी भडकावू नका : जितेंद्र आव्हाड

राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला. कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे. त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत त्याच्याशी आमचा काय संबंध. त्यांना मोसा चिमुर द्या नाहीतर अमेरिकेची सीआयए द्या. महागाईचा दर 14 वर पोचला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यावर चर्चा करायला हवी, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in