आंदोलने करुन उगाच आगीत तेल ओतू नका- राऊतांचा पलटवार

जे लोक दंगे (Riots) भडकवत असतील ते गुन्हेगारच
आंदोलने करुन उगाच आगीत तेल ओतू नका- राऊतांचा पलटवार
Sanjay Raut

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) रविवारी (२१ नोव्हेंबर) अमरावती (Amaravati) दौऱ्यावर होते. काल त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यसरकारवर अमरावती हिंसाचार घटनेवर एकतर्फी कारवाई करत असल्याचे आरोप केले. या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षावर पलटवार केला आहे.

''महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. अमरावती कोणी पेटवली, हे राज्याच्या, अमरावतीच्या जनतेला आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहित आहे. अमरावती आता शांत झाली असताना विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल ओतू नये. अमरावती सारख्या घटना राज्यात पुन्हा नयेत म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी प्रयत्न करावेत,असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
राज्यातील 'या' तीन जिल्ह्यात कडक संचारबंदी

देवेंद्र फडणवीसांनी काल राज्यसरकार भाजपच्या कार्यकर्त्यांवर एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले म्हणजे केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं होत नाही. अमरावतीच्या जनतेच्या खासगी संपत्तीचं नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणारच. जे लोक दंगे भडकवत असतील ते गुन्हेगारच आहेत. त्यांच्यावर जी कारवाई करायची असेल ती गृहमंत्री करतीलच. पण तुम्ही आंदोलने कशासाठी करता, असा सवाल करत त्यांनी कायद्याने सर्वांचा न्याय होईलच,असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

पण भाजप जे आंदोलन करत आहे ते राजकीय पोळी शेकण्यासाठी करत आहे. त्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. आंदोलन करायचं तर अमरावतीत शांतता राखण्यासाठी करावं, असही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी रजा अकॅडमीवर बंदीबाबत तुम्ही सरकार मधे होतात तेव्हा का नाही बंदी घातली. असा सवाल करत आता रझा अॅकॅडमीच्या बंदीचा निर्णय राज्य सरकार घेईल, असाही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in