Dombivali News : शाखेच्या ताब्यावरून ठाकरे - शिंदे गट भिडले : पोलिसांनी केली मध्यस्थी!

Dombivali News : ठाकरे गट समर्थक आणि शिंदे गट समर्थक आमने सामने, पोलीस आल्याने तणाव निवळला!
THackeray Shinde Group
THackeray Shinde GroupSarkarnama

डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातला सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रिय निवडणूक आयोगाच्या दारात पोहचले आहे. जून महिन्यापासून ते आतापर्यंत या दोन्ही गटातला सत्तानाट्य सुरूच आहे. एकीकडे कायदेशीर लढाई सुरू असताना अनेकदा रस्त्यावरची लढाईसुद्धा घडून आली आहे. दोन्ही गटामध्ये तूफान राडा ही वेळोवेळी सुरूच होता. आता डोंबिवली शहरात या दोन्ही गटांमध्ये शाखेच्या ताब्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे.

THackeray Shinde Group
दिवाळीनंतर राज्यात प्रशासकीय फेरबदल ; शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

डोंबिवली शहरामध्ये शिससेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाले आहे. डोंबिवली शहर शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. शाखेवर शिंदे गटाने दावा केल्याने दोन्ही गटात जोरदार वाद झाला. शाखेचे करार आपण केल्याचा दावा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र ठाकरे गटाचे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक समोरासमोर आले.

THackeray Shinde Group
Currency : भारतीय नोटांवर पंतप्रधान मोदींचाही फोटो असावा : भाजप आमदाराची मागणी!

यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता होती. दोन्हीकडचे नेते हमरी तुमरीवर आले होते. मात्र या ठिकाणी वेळीच पोलीस आल्याने राडा झाला नाही. होणारा अनर्थ टळला. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत जमावाला रोखले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in