Dombivali News : "तुमच्या पायाखाली काय आहे ते पहा," ; भाजप आमदाराने राऊतांना सुनावले!

Dombivali News : "प्रत्येक बाबतीत बोलायलाच पाहिजे, असं नाही.."
Dombivali News
Dombivali NewsSarkarnama

Dombivali News : नविन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे याचे भान राज्यपालांनी ठेवावं, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केली आहे. या टीकेला भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.'प्रत्येक बाबतीत बोलायलाच पाहीजे असे नाही. रोज विषय आला की, त्यावर बोलायचं. पहिले तुमच्या पायाखाली काय आहे ते पहा, मग समोरच्या दृष्टीने बोला' असे बोल त्यांना राऊत यांना सुनावले आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर हे डोंबिवलीत उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू जोशी, नंदू परब हे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. 14 फेब्रुवारीला दिवसभर केंद्रीय मंत्री ठाकुर हे कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ठाकूर यांनी या मतदार संघाचा दौरा केला होता. त्यावेळी विकास कामांवरुन ठाकूर यांनी पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना देखील फैलावर घेतले होते.

Dombivali News
Sanjay Rathod : ठाकरेंच्या व्यूव्हरचनेवर राठोडांचा मास्टर स्ट्रोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् हजारोंचा जनसमुदाय

पक्ष बांधणीसाठी भाजपचे मंत्री हे लोकसभा मतदार संघाचे दौरे करत आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. ठाकुर यांच्या दौऱ्याने कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. ठाकुर यांच्या दुसऱ्या दौऱ्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे.

याविषयी केळकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, "मी प्रभारी म्हणून या मतदार संघाचे काम पहात आहे. संघटना मजबूत करणे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीत राहणे, त्या अनुषंगाने हा दौरा असून, शतप्रतिषत सर्व लोकसभा मतदार संघात आमची तयारी झाली पाहीजे. त्याच दृष्टीने हा मतदार संघ देखील आहे. आम्हाला वरिष्ठांकडून आदेश येतील त्या पद्धतीने काम करत आहोत. लोकसभा मतदार संघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार असले तरी, तेथे आम्ही आमचे काम सोडलेले नाही. पक्षाने आदेश दिल्यास त्या पद्धतीने कल्याण लोकसभा मतदार संघातही काम करण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी पुन्हा एकदा दिले आहेत.

Dombivali News
Pune By-Electon : चिंचवड आणि कसब्यात आघाडीच्या विजयाचे जयंत पाटलांनी मांडले असे गणित!

बुलेट ट्रेनला "वंदे मातरम" नाव द्यावे....

वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत, पुढच्या काळात बुलेट ट्रेन देखील सुरु होईल. दरम्यान या बुलेट ट्रेनला "वंदे मातरम" नाव द्यावे अशी मागणी केंद्र शासनाकडे करणार आहे. बुलेट या शब्दावेजी वंदे मातरम हे राष्ट्रीयत्व जागं करणारे नाव आहे, त्यामुळे बुलेट ट्रेनला "वंदे मातरम" नाव द्यावे, असे आमदार केळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in