Ajit Pawar| जिल्ह्यांना पालकमंत्री नेमायला वेळ नाही का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Ajit Pawar| पालकमंत्री पदासाठी एकेका जिल्ह्यात दोघे-दोघे इच्छुक
Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar and Eknath ShindeSarkarnama

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. पण एकाही जिल्ह्याला अजून पालकमंत्री नेमलेले नाहीत. पण, नवीन पालकमंत्री येईपर्यंत डिपीडिसीचे पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे याबाबत निर्णय घेतील, असे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मग राज्य सरकारला जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यासाठी वेळ का नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकाला केला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आज जिल्ह्यांना पालकमंत्री नेमलेले नसल्याने विकास कामामंध्ये अडथळा निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. ''आज सप्टेंबर महिन्याची १२ तारीख आहे. मार्च एंडिंगपर्यंत हे पैसे खर्च केले नाहीत तर ते पैसे लॅप्स होतात, पण राज्य सरकारला जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यासाठी वेळ का नाही हे कळायला मार्ग नाही. आम्ही सत्तेत असताना माझ्याकडे नियोजन खातं होतं त्यावेळी आम्ही ते पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे याचे सर्व प्लॅनिंग केलेलं असायचं, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar and Eknath Shinde
अधिवेशनातून निघून का गेले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

आमच्या कानावर आलंय की आमदारांची नाराजी वाढेल म्हणून हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढील मंत्रीमंडळ विस्तार होणार नाहीये. पालकमंत्र्यांच्या बाबतीतही एकेका जिल्ह्यात दोघे-दोघे इच्छुक आहेत, मग पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं असाही यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे का, याचंही स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे.

काल राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश पाऊस झाला, धरणं भरलेली असताना पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लोच पाणी धरणातून सोडंल आहे. पण यात लक्ष कोणी द्यायचं, त्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही फक्त वीस जणांना झेंडावंदन करायला मिळालं. बाकीच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झेंडावंदन करावं लागलं, हे लोकशाहीला मान्य होणारं नाही. राज्यात हा जो काही कारभार सुरु आहे, त्याचा मी तीव्र शब्दांत धिक्कार करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in