रेमडेसिवरच्या काळाबाजारप्रकरणी डॉक्टरला अटक; औषध दुकानदारच भावाच्या मदतीने करीत होता काळाबाजार

त्याचा भाऊ शशीकांतचे ओनेक्समध्ये आय़ुश्री मेडिकल, तर स्वत डॉ. सचिनचे क्रिस्टलमध्ये गोदावरी मेडिकल हे औषधांचे दुकान आहे. या दोन्ही रुग्णालयाकरिता या दोन मेडिकलमध्ये आलेली २१ रेमडेसिवर काळ्याबाजारात विकण्याच्या तयारीत असताना आरोपींना पकडण्यात आले आहे.
रेमडेसिवरच्या काळाबाजारप्रकरणी डॉक्टरला अटक; औषध दुकानदारच भावाच्या मदतीने करीत होता काळाबाजार
Doctor arrested in remedisivir black market case

पिंपरी : रेमडेसिवर (Remedisivir) इंजेक्शनचा काळाबाजार करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि औषध दुकानदार पकडले गेल्यानंतर आता एका डॉक्टरलाच या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलिसांनी अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा बीएएमएस डॉक्टर दोन खासगी रुग्णालये चालवित होता. डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ (Dr. Sachin Panchal) असे या डॉक्टरचे नाव आहे. तो आपला औषध दुकानदार सख्खा भाऊ व इतर दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो हा काळाबाजार करीत होता. (Doctor arrested in remedisivir  black market case)

तो चालवित असलेल्या दोन रुग्णालयांसाठीच्या रेम़डेसिवरचा ही टोळी काळाबाजार करीत होती. त्यातील त्याचा भाऊ शशिकांत व त्याचे साथीदार कृष्णा पाटील (नर्सिंग स्टाफ), निखील नेहरकर (मेडिसीन डिलीव्हरी बॉय) यांना नऊ तारखेला सरप्राईज नाकाबंदीत काळेवाडी फाटा येथे फौजदार अवधूत शिंगारे, पोलिस नाईक चौधरी, अतिश जाधव यांनी पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे २१ रेमडेसिवर मिळाली होती.

काळ्याबाजारात ती ते विकण्याच्या तयारीत होते. त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यात शशीकांतचा डॉक्टर भाऊ सचिनचा सहभाग आढळल्याने आता त्यालाही अटक करण्यात आली. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तो चिंचवड येथील ओनेक्स, तर थेरगांव येथील क्रिस्टल ही दोन खासगी हॉस्पिटल चालवतो.

त्याचा भाऊ शशीकांतचे ओनेक्समध्ये आय़ुश्री मेडिकल, तर स्वत डॉ. सचिनचे क्रिस्टलमध्ये गोदावरी मेडिकल हे औषधांचे दुकान आहे. या दोन्ही रुग्णालयाकरिता या दोन मेडिकलमध्ये आलेली २१ रेमडेसिवर काळ्याबाजारात विकण्याच्या तयारीत असताना आरोपींना पकडण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करीत आहेत.
 

Related Stories

No stories found.