Eknath Shinde News: मुख्यमंत्रीपद हवंय का? अन् शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं; केसरकरांनी सांगितला 'तो' किस्सा

Deepak Kesarkar : ''बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान फक्त संजय राऊतांनी केला...''
Deepak Kesarkar and Eknath Shinde
Deepak Kesarkar and Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Politics : ''उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे का? अशी विचारणा केली होती. मात्र, तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आले होते. कारण एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला होता. आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा पद्धतीने परत केली जाते, याचं एकनाथ शिंदेंना खूप वाईट वाटलं'', असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, ''राज्यसभेची निवडणूक झाली. त्यामध्ये पराभव झाला. या पराभवाचा जाब राष्ट्रवादीला विचारला गेला नाही. पण उलट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील जबाबदारी काढून घेण्यात आली आणि एका तरुण आमदारांकडे जबाबदारी देण्यात आली. ते आमच्यावर नजर ठेवत आहेत असंच वाटायचं. ज्यांना राजकारण माहित नव्हतं ते तरूण दादागिरी करत होते '', असं ते म्हणाले.

Deepak Kesarkar and Eknath Shinde
Aditya Thackeray : माझे आजोबाही म्हणत असतील, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण..

''स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीबरोबर जायला नको होतं. आपण आपल्या मुळ युतीकडे जाऊया, असं शिंदे यांचं म्हणणं होतं'', असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. तसेच ''मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय काय केलं? याबाबत सविस्तर पुढील 2-4 दिवसांत पक्षाचा प्रवक्ता म्हणून सांगणार आहे'', असंही केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar and Eknath Shinde
Politics : कट्टर राजकीय विरोधक सत्यजीत तांबे अन् शुभांगी पाटील आले आमने-सामने; पण...

''जे लोक झोपतात ते स्वप्न बघतात. पण जे लोक काम करतात ते दिवसरात्र धावत राहतात. मुख्यमंत्री देखील झोपत नाहीत तर रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करत राहतात. आम्ही सकाळी 11 वाजल्यानंतर कार्यक्रम करणारे लोक नाहीत. आम्ही जनतेची सेवा करणारे लोक आहोत. आम्हीच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत'', असंही ते यावेळी म्हणाले.

Deepak Kesarkar and Eknath Shinde
Abhijeet Bichukale : गजानन काळेंचं नाव आजपासून 'गांजा काळे' म्हणत बिचुकलेंनी घेतला मनसेशी पंगा!

''बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्वप्नांना काँग्रेस विरोध करत होती. पण त्यांनाच काश्मिरमध्ये जाऊन भेटण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा एवढा मोठा अपमान कुणीही केला नाही. तो फक्त संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. सत्तेसाठी जे लोक काँग्रेसचे पाय धरतात. राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही'', असा हल्लाबोल केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in