'मनसे'ला गृहित धरु नका; राजू पाटील यांच्या गुगलीने भाजपचे गणित चुकणार?

Raju Patil | MNS : अयोध्या दौऱ्याच्या विरोधावरुन राज ठाकरे भाजपवर नाराज.
Raju Patil, Raj Thackeray
Raju Patil, Raj Thackeray Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विजयासाठी दोन्ही बाजूला प्रत्येक मत महत्वाचं बनलं आहे. यासाठी प्रत्येक पक्षाने आता रिसॉर्ट पॉलिटीक्सला सुरुवात केली आहे. याशिवाय अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातातही विजयाची चावी असणार आहे. यात मनसे पक्षाचे आमदार पाटील यांची भूमिका देखील यात निर्णायक ठरणार आहे. पण मागील काही दिवसांपासून ते नॉट रिचेबल असल्याने ते नेमके कोणासोबत आहेत याविषयी प्रश्नचिन्ह कायम होती.

यावर आता स्वतः आमदार राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागील काही दिवसांपासून तब्येतीमुळे आपण फारसे कोणाच्या संपर्कात नसल्याचे पाटील सांगत आहेत. तसेच राज्यसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याच आदेशानुसार भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनसे तटस्थ भूमिका घेणार का? याविषयी चर्चा सुरु आहेत. कारण यापूर्वी मनसेने अनेकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. अगदी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळीही मनसे तटस्थ होती. त्यांनी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केले नाही.

मागील काही वर्षांपासून ठाकरे सरकारला राज यांनी लक्ष केल्याने भाजपाने राज ठाकरे यांना पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे भाजपा मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या भेटीला उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषणसिंग यांनी जाहीर विरोध करत राज यांची कोंडी केली. त्यानंतर राज यांनी भाजपा नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे आता मनसे आमदार राजू पाटील हे विधानसभेत कोणाला मतदान करतात, त्यावरून भाजपा आणि मनसेत सारे काही आलबेल आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.

याविषयी आमदार पाटील यांना त्यांची भूमिका विचारली असता, आम्ही सभागृहात तटस्थ म्हणून आहोत. जेव्हा फ्लोर टेस्टिंग झाली तेव्हा आम्ही तटस्थ राहिलो. यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांचा फोन आणि मेल आला होता. त्यावेळेस राज साहेबांचा आदेश घेऊन त्यांच्या नॉमिनेशन फॉर्मवर सही केली होती. परंतु या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश नाही. त्यामुळे ते जसे सांगतिल त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचं का? कोणाला करायचं? की तटस्थ रहायचे? हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतिलं त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू असे सूतोवाच पाटील यांनी केले आहेत.

मला कोणी उचलून नेणार आहे का?

आमदार फुटू नये म्हणून शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. त्यातच काही दिवस आमदार पाटील हे कोणाचा फोन घेत नसल्याने ते देखील कुठे गायब झाले का? या चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत, यावर आमदार पाटील म्हणाले, फोन घेतला नाही म्हणजे मला काय कोणी उचलून नेणार आहे का? माझी तब्येत ठीक नसल्याने तसेच शनिवारी प्रशासकीय काही काम नव्हती, त्यामुळे घरी आराम करत होतो. नॉट रिचेबल असणे किंवा मला कोठे घेऊन जाणे हे माझ्या बाबतीत या अशा गोष्टींसाठी तरी शक्य होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com